मुसळधार पावसाने न्यू महसूल कॉलनीतील रस्ते जलमय

मुसळधार पावसाने न्यू महसूल कॉलनीतील रस्ते जलमय
बुद्ध विहाराला तलावाचे स्वरुप; नाल्या नसल्याने जनतेचे हाल

अकोला: दोन दिवसापासून जिल्हाभरात मुसळधार पाऊस सुरु असून आजूबाजूला पुराचे थैमान तर आहेच परंतू प्रभाग क्र. २० च्या नाकत्र्या नगरसेवकामुळे व नालीचे कोणतेच नियोजन नसल्याने पावसाचे पाणी प्रत्येक रस्त्यावर साचून खडकी विभागातील न्यू महसूल कॉलनी परिसर जलमय झाला आहे. प्रत्येक रस्त्यावर एक पुâटापर्यंत पाणी वाहत आहे. तर काहींच्या घरात सुद्धा पाणी घुसले आहे.
हद्दवाढ भागातील नगरसेवकांनी या भागाकडे कमालीचे दुर्लक्ष केले. न्यू महसूल कॉलनी, संत नगर, साईनाथ कॉलनी येथे नाल्या नाहीत, नाली नसल्याने साफसफाई नाही, लाईटची सुविधा नाही, आम्ही विहीरीजवळ एक लाईट मागतला परंतू पाच वर्षात एक लाईट नगरसेवक लाऊ शकले नाही, साप निघतात या भागात राहणारे लोक अंधारात जीवन जगत आहेत. तसेच न्यू महसूल कॉलनीमध्ये असलेले ‘पंचशिल बुद्ध विहार’ आजूबाजूचे रस्त्यावरचे पाणी नाली नसल्याने बुद्ध विहारात घुसल्याने बुद्ध विहाराला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खडकी विभागातील जनता ‘असे नगरसेवक पुन्हा नको रे बाबा’ असे म्हणत आहेत. निष्क्रीय नगरसेवकांमुळे न्यू महसूल कॉलनी व येथील प्रत्येक रस्ते जलमय झाले आहे. जनतेमध्ये कमालीचा रोश निर्माण झाला आहे. आयुक्त साहेबांनी या भागाची पाहणी करून रस्ते व नाल्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news