नदीच्या काठावर ठोक्याने केलेले शेती पुराने खरडुन गेल्याने दिलीप सुर्यवंशी या शेतकऱ्याने केली आत्महत्या!
बाळापुर – तालुक्यातील बोरगाव वैराळे येथील शेतकऱ्याची शेती उमरी तालुका तेल्हारा येथे याच बोरगाव वैराळे शेत शिवारालगत असलेल्या उमरी ता तेल्हारा शिवारात स्वतः च्या काकाची शेती ठोक्याने केली होती मागील तीन दिवसापासून सतत धार पावसाने उमरी शिवारात पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या या शेतात पुर येऊन शेती खरडुन गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या दिलीप राजाराम सुर्यवंशी वय ४८ या तरूण शेतकऱ्याने त्याच शेतात दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान शेतात धु-यावर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवली
मागील पाच वर्षापासून बोरगाव वैराळे गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या पूर्णा नदीला पुर येत असल्याने शेकडो एक्कर जमीन पुराच्या पाण्यात वाहून जात असल्यामुळे खरिपाच्या पिकाचे नुकसान होत आहे गतवर्षी पुरातुन कपाशीचे पिक वाचलेल्या शेतकऱ्यांना ब-यापैकी कपाशीचे पिक झाले परंतु भाव नसल्यामुळे बेभाव कापूस विकावा लागला होता तोच प्रकार दिलीप सुर्यवंशी या शेतकऱ्यासोबत देखील झाला आगामी वर्षात चांगले पिक होईल या उद्देशाने या शेतकऱ्याने स्वतः च्या पाच एक्कर शेतासोबत आपल्या काकाची जमीन देखील ठोक्याने करून कपाशीचे पिक पेरले होते पहिल्यांदा केलेली पेरणी उगवली नाही म्हणून इकडून तिकडून पैसे हात उसने घेऊन दुबार पेरणी केली दुबार पेरणी केल्यावर काल या शेतकऱ्याने ठोक्याने केलेल्या शेतातून स्वमालकीच्या शेतात पुर्णेच्या पुराचे पाणी शिरले व दहाही एक्कर शेतातील खरिपाचे पिक उदध्वस्त होण्यासोबत शेतातील सुपीक मातीचा थर खरडुन गेला आधीच आर्थिक संकटात असलेल्या दिलीप वर अस्मानी संकट कोसळल्याने तो खचला आणि गळफास घेऊन आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचल्याने त्याच्या मागे असलेले आई पत्नी,दोन मुले आणि एक मुलगी उघडयावर पडले आहेत दिलीप राजाराम सुर्यवंशी हा युवक अतिशय मनमिळाऊ असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे