जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर युवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा स्त्री रुग्णालय बाजूला असलेले छोटे-मोठे व्यवसायिक यांची दुकाने जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने तोडण्यात आली. छोटे व्यवसाय करून येथील व्यवसायिक आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करीत असतात. गत पंधरा दिवसांपूर्वी ही कारवाई झाली असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी यांना दोन ते तीन वेळा निवेदने देऊन, पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज 23 जुलै रविवार रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर व्यावसायिक रवी सरदार या युवकाने पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासन तात्काळ जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळ हजर होऊन, सदर युवकाचे प्राण वाचविले व युवकाला ताब्यात घेतले आहे. सदर युवकाने यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिष्ठाता आरती कुलवाल आणि जिल्हाधिकारी निमा अरोरा जबाबदार असल्याचे सांगितले आहे.