पावसाचे पाणी शिरलेल्‍या शहरातील सखल भागात साथरोग नियंत्रणाच्‍या अनुषंगाने मनपाव्‍दारे सर्व्‍हेक्षणाचे कामास प्रारंभ.

पावसाचे पाणी शिरलेल्‍या शहरातील सखल भागात साथरोग नियंत्रणाच्‍या अनुषंगाने मनपाव्‍दारे सर्व्‍हेक्षणाचे कामास प्रारंभ.

अकोला दि. 24 जुलै 2023 – अकोला शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी शिरले असल्‍याने साथरोगाच्या अनुषंगाने नियंत्रण व रोकथामासाठी विशेष लक्ष घालून उपाययोजना करण्याच्या काल दिलेल्‍या मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या सुचनेनुसार आज दि. 24 जुलै पासून साथरोग प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍यासाठी मनपा वैद्यकीय आरोग्‍य विभागाव्‍दारे शहरातील ज्‍या सखल भागांमध्‍ये पासाचे पाणी शिरले होते त्‍या भागात सर्व्‍हेक्षणाचे काम सुरू करण्‍यात आले आहे. ज्‍यामध्‍ये शिवसेना वसाहत, हरिहरपेठ, डाबकी रोड, अशोक नगर, संजय नगर, कृषी नगर, सिंधी कॅम्‍प, हैदरपुरा सह विविध भागात सर्व्‍हेक्षणाचे काम झाले आहे.  यामध्‍ये मनपा वैद्यकीय आरोग्‍य विभागाच्‍या आशा वर्कर, परिचारिका, एम.पी.डब्‍ल्‍यु आणि मलेरिया विभागातील कर्मचा-यांचा समावेश असून या सर्व्‍हेक्षणाव्‍दारे त्‍या भागात राहणा-या नागरिकांची तपासणी केली जात असून ज्‍यांना सर्दी ताप, खोकला, अतिसार सारख्‍या लक्षण दिसणार त्‍यांना प्रथमोचार साठी पाठविण्‍यात येणार असल्‍याबाबतची माहिती मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.अनुप चौधरी यांनी दिली आहे.


अकोला महानगरपालिका समग्र शिक्षा अंतर्गत विद्या समीक्षा केंद्र कार्यशाळा संपन्न.

अकोला दि. 24 जुलै 2023 – आज दिनांक 24 जुलै 2023 अकोला महानगरपालिकेच्‍या स्‍थायी समिती सभागृह येथे मनपा समग्र शिक्षा अंतर्गत एक दिवसीय विद्या समीक्षा केंद्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

विद्या समीक्षा केंद्र ही संकल्पना केंद्र व राज्य शासन पुरस्कृत असून शाळांच्या सर्व ऑनलाईन माहितीचे एकत्रीकरण करणे व एका क्लिकवर सबंध डाटा प्रत्येक शाळेचा मिळण्यास सोपे झाले आहे. मनपा अधिनस्त 32 शाळा व खाजगी व्यवस्थापनाच्या 09 शाळा यांचे मुख्याध्यापक किंवा एक तंत्रस्नेही शिक्षकांना सदर कार्यशाळेतून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षण कार्यशाळा ही राज्यसमन्वयक उमेश सराळे सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद शाळा गुंजवाडा तसेच राज्य समन्वयक प्रमोद मस्के सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा निंबी (मा) यांचे मार्गदर्शनात संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन मनपा प्रशासन अधिकारी अनिल बिडवे यांच्या हस्ते व मार्गदर्शनात करण्यात आले. विद्या समीक्षा केंद्र यांचे महत्त्व विशद करताना दिवसभरात विविध विषयानुषंगाने प्रत्यक्ष विद्या समीक्षा पोर्टल च्‍या माध्‍यमातून कृती करून घेण्यात आल्या. सदर विद्या समीक्षा केंद्र पोर्टल हे विविध माहितीचे एकत्रित स्त्रोत म्हणून कार्य करणारे असेल. यामध्ये विद्यार्थी उपस्थिती, शिक्षक उपस्थिती, स्वाध्याय, कृती कार्यक्रम, अध्ययन निष्पत्ती आधारित इयत्तानिहाय प्रगती यासारख्या महत्त्वाच्या बाबी पहायला मिळणार आहे. याद्वारे एका क्लिकवर माहिती मिळण्यास केंद्र, राज्य जिल्हा, तालुका यांना सुलभ होणार आहे.

  सदर कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी समग्र शिक्षा च्या विषयसाधनव्यक्ती वैशाली शेंडे, लीना रामटेके यांनी पार पाडली तर कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता उमेश सोनोने व भावना कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news