राष्ट्रवादी काँग्रेस कडून अतिवृष्टीचे सर्वे करण्याची मागणी
अकोट प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी तालुका महासचिव ग्रामीणचे कैलाश थोटे यांनी तहसीलदार यांना 21 जुलै रोजी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पंचनामे करावे.
12 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे अकोट तालुक्यातील, मुंडगाव लोहारी परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. जमिनीवर आलेली पिके उद्धवस्थ झाली. पाण्यामुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.नदीच्या पुरामुळे मुंडगाव, लोहारी, अमिनपूर, खानापूर, जळगाव, नेव्होरी, लामकानी व तालुक्यातील परिसातील “नदी काठच्या हजारो एकर शेतीमध्ये पाणी गेल्यामूळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी सुरूवातीला पेरणी केल्याने त्यांची पिके उत्तम होती. मात्र अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला अंकुरलेले पिके नाहीशी झाली. करीता आपण तात्काळ सर्वे करावा याकरता निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन करते कैलाश थोटे, सुनील नागोलकार, प्रवीण खलोकर, ज्ञानेश्वर झांबरे, श्रीकृष्ण कुऱ्हे, श्रीकृष्ण उजिले, गुलाबराव बहाकर, विलास ठाकरे, रमेश भेले, गोपाल नारे ,मिलिंद झांबरे गोपाल ठाकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होता.