पुरपिडीतांच्या मदतीला वंचितचे पदाधिकारी आले धावुन
अकोट प्रतिनिधी
दि.२१जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी येथील शेकडो हेक्टर जमिन खरडुन गेली,नदीकाठच्या लोकांच्या घरात पाणी शिरले,तर दोन युवक वाहुन गेले होते,पैकी अंकीत ठाकुर या एका युवकाचा मृतदेह आज दुपारी अटकळी शिवारात सापडला ,तर भाचा पृथ्वी चव्हाण कालच सुखरुप पंचगव्हाण येथे सापडला,तर दोन युवकांना अनंतराव अवचार व सहकार्यांनी झाडावर पाच तास बसलेल्या युवकांना सुखरुप बाहेर काढलं,तर दोन युवकांना शोधपथकाच्या लोकांनी बाहेर काढलं,ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी नेते व अकोट विधानसभेचे २०१९ चे पराभुत ऊमेदवार अँड.संतोष रहाटे यांनी मतदारांप्रती कृतज्ञता दाखवुन ब्ल्यँकेटचे वाटप करुन पराभुत झाल्यावरही सहानुभुती आणी प्रामाणीकता जपली यावेळी त्यांचेसोबत जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे,जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, जि.प.अध्यक्षा संगिताताई अढाऊ,जि.प.ऊपाध्यक्ष सुनिल फाटकर, जि.प.सदस्य अनंतराव अवचार,तेल्हारा पं.स.सभापती आम्रपालीताई गवारगुरु,पं.स.सदस्य,अनिल मोहोड,महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा,प्रभाताई सिरसाठ,जिल्हा महासचिव,शोभाताई शेळके,जिल्हा महासचिव निलोफर शहा,मोहन रोकडे,दिपक बोडखे, निखील गावंडे,तुषार पाचकोर,तेल्हारा ता.अध्यक्ष अशोक दारोकार, अकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे,विणा मोहोड,रोशन दारोकार,माजी.पं.स.सदस्य श्रीकृष्ण गोडबोले,डाँ.मोहन ऊगले,प्रदिप तेलगोटे,रविंद्र मोहोड,धम्मपाल दारोकार,विजय मोहोड,विपुल बहाकर ,धिरज शेंगोकार,बाळुभाऊ ठाकुर,रतनसिंग गोठवाल,प्रणव अवचार, नितीन चांदने, सुनिल घनबहादुर,अनय अवचार, समीर पठाण,युवक आघाडी ता.अध्यक्ष झिया शहा,महासचिव संदिप गवई,मुश्ताक शहा,स्वप्निल सरकटे, यांच्यासह वंचितचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते,तालुक्यासह जिल्हा पदाधिकारी यांनी जि.प.सदस्य अनंतराव अवचार यांच्या कामाचे कौतुक करुन पुरपिडीत लोकांना शासन व प्रशासनाकडुन जास्तीत जास्त मदत मिळवुन देन्याच अभिवचन दिलं,वंचित बहुजन आघाडीची फक्त अकोला जि.प.मध्ये सत्ता आहे,तरीहि तत्परतेने ते पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावुन आले,तसेच अँड.संतोषजी रहाटे साहेब हे पराभुत झाल्यावरसुद्धा त्यांनी मतदारांप्रती प्रामाणीकता दाखविली,याबद्दल गावकर्यांनी २०१९ मधे झालेल्या चुकीबद्दल खाजगीमधे दिलगीरी व्यक्त करुन सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्तै यांचे कौतुक केले.