पातुर महावितरण उपविभागांतर्गत अधिकाऱ्यांचे खांदेपालट
पातुर महावितरण उपविभाग अंतर्गत एकाच टप्प्यात उपविभागीय अधिकारी पासून ते तंत्रज्ञ पर्यंत बहुतांश बदल्या झाल्याने पातूर उपविभागाअंतर्गत अधिकाऱ्यांचे खांदेपालट झाले आहे 2017 पासून पातुर विभागाची उपकार्यकारी अभियंता म्हणून जबाबदारी सांभाळणारे संतोष खुमकर यांची प्रशासकीय बदली अकोला येथे झाली असून पातुर शहर अभियंता हे पद राठोड यांच्या सेवानिवृत्तीपासून रिक्तच आहे उपविभागाअंतर्गत पातुर ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता शैलेश देशमुख यांचे सुद्धा अमरावती येथे बदली झाली आहे तथा महावितरण कार्यालय अभियंता श्री मिरगे यांचे सुद्धा अमरावती येथे बदली झाली आहे एकाच टप्प्यात एवढ्या साऱ्या महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने पातुर शहरात एकदमच खांदेपालट झाला आहे त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना येथे रुजण्यास वेळ लागणार आहे कारण उपविभागीय अभियंता संतोष खुमकर यांनी योग्यरित्या पातुर उपविभागाची धुरा सांभाळली होती त्यांचे अंतर्गत येत असलेल्या सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांना ते योग्य मार्गदर्शनाद्वारे आणि नियमनाद्वारे कामाचे नियोजन करून देत असत परंतु त्यांच्या जागी आता बारामती येथील अभियंता श्री रंगारी यांची पातुर उपकार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांच्यासमोर पातूर उपविभाग अंतर्गत असलेल्या सर्व गावांची धुरा आहे ,पातूर शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे जागरूक नागरिकाचे शहर असल्याने येथे सेवा पुरवणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागणार आहे, श्री रंगारी यांना दुर्गम ग्रामीण भागातील महत्वपूर्ण दुवा असलेले सस्ती सेक्शन याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल , शहरातील अनेक दिवसांपासून खाली असलेले शहर अभियंता पद लवकरात लवकर भरावे लागेल, नवनियुक्त अधिकारी वर्ग उपविभागाचा भार कसा पेलवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नागरिकांना सुरळीत सेवा पुरवणे हे महावितरण चे काम आहे, रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्यात येतील आणि उपविभागा अंतर्गत सुरळीत विधुत पुरवठ्या कडे लक्ष केंद्रित करण्यात येईल
श्री रंगारी उपकार्यकरी अभियंता पातूर