सत्य लढा विशेष संपादकीय सर्वसामान्यांच्या समस्या व तक्रारी जनतेसमोर मांडणे व प्रशासनापर्यंत पोहोचवणे आमचे आद्यकर्तव्य

सर्वसामान्यांच्या समस्या व तक्रारी जनतेसमोर मांडणे व प्रशासनापर्यंत पोहोचवणे आमचे आद्यकर्तव्य

प्रसार माध्यम हे लोकशाहीचे चवथे आधारस्तंभ असून या लोकशाहीच्या चवथ्या आधारस्तंभाचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेच्या समस्या, तक्रारी ह्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे आमचे आद्य कर्तव्य आहे. अकोला महानगरामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक पक्ष, आघाड्या कार्यरत असून प्रत्येक जण सर्वसामान्यांना आपण जनतेच्या किती हिताचे कार्य करीत आहोत हे दाखवून देण्यासाठी निरनिराळे प्रलोभने, आपले कार्यवृत्त अहवाल हे प्रसार माध्यमांच्या माध्यातून सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पत्रकार परिषदांचे आयोजन करीत असतात. यामध्ये तो पक्ष लहान असो अथवा मोठा त्याचे म्हणणे हे सर्वसामान्य नागरीकांपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहोचविणे हे प्रसार माध्यमांचे कार्य असल्यामुळे ते आपले कार्य पत्रकार बांधव है। इमाने इतबारे अकोल्यामध्ये करीत असतात. यामध्ये अनेक राष्ट्रीयकृत पक्षांचे जाहीरनामे, इतर पक्ष, पदाधिकारी यांच्यावर टिका टिप्पणी यावर पत्रकार परिषदा ह्या महानगरमध्ये नित्यानेच आयोजित केल्या जातात. यामध्ये कोणत्याही राजकीय पदाधिकारी हे आपले म्हणणे सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसार माध्यमांच्या सहाय्याने ते सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचत असतात.

सध्याचे युग हे वेगवान असे युग झाले असल्यामुळे सध्या कुणालाही टिव्ही समोर बसून बातम्या पाहण्याचा वेग नसल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा ओढा सध्या सोशल मिडीयाकडे जास्त वळला आहे. या सोशल मिडीयाच्या माध्यमातून राजकीय पदाधिकारी आपल्या टिका- टिप्पणी, आपण राबवित असलेल्या विविध योजना याविषयी सोशल मिडीयावर व्हिडीओच्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या अधिकृत अश्या पोर्टल व यु-ट्युब चॅनलच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडत असतात. यामध्ये राष्ट्रीयकृत चॅनेलपासून तर लोकल न्यूज चॅनलपर्यंत प्रत्येक चॅनल्स आता यु-ट्युबवर उपलब्ध असल्यामुळे आता कोणताही चॅनल लहान अथवा मोठा असा भेदभाव आता उरलेला नाही. त्यामुळे प्रत्येकच चॅनल हे युट्युबवर येत असल्यामुळे ते अधिकृतच आहेत.

प्रसार माध्यमांचा उद्देश्य हा केवळ जलदगतीने समस्या, तक्रारी ह्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे हाच असतो. त्यामध्ये कुठल्याही राजकीय पदाधिकारी अथवा राष्ट्रीयकृत पक्ष, संघटना यांची वैयक्तीकरित्या बदनामी करणे हा कदापीही नसतो. सर्वसामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्याकरिता पत्रकार बांधव हे रात्रंदिवस एक करीत असतात. त्यांना सर्वसामान्य नागरीकांच्या समस्याबद्दल अत्यंत आत्मीयता असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांकरिता पत्रकार बांधव हे अधिकाऱ्यांशी बोलुन समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यामुळेच “समाजामध्ये पत्रकारांना बिना पैशाचा वकील असे सुद्धा म्हटल्या जाते. “

पत्रकार बांधव हे कुठलाही वैयक्तीक लाभाची अपेक्षा न ठेवता एवढे सर्व समाजसेवेचे कार्य करीत असताना एखाद्या राजकीय पदाधिकारी हा दुसऱ्या राजकीय पदाधिकाऱ्याची कानउघडणी करीत असेल व त्याच्या कृतीतून फरक दिसून येत असेल त्या गोष्टीची त्याला आठवण करुन देणे व त्याविषयीचे वृत्त एखाद्या पत्रकाराने चॅनल अथवा वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करणे, हा कसा काय गुन्हा ठरु शकतो. आपल्याला मिळालेल्या विशेषाधिकाराचा दुरुपयोग करुन प्रसार माध्यमांना वेठीस धरणे हे कोठपर्यंत योग्य आहे ? प्रसार माध्यम हे संविधानाचे चवथे आधारस्तंभ आहेत, ह्या चवथ्या आधारस्तंभांचा गळचेपी करणे व त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे पत्रकाराच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. त्यामुळे आपले दुखते कुठे व आपण सांगतो कुठे? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या कुठल्याही विशेषाधिकाराचा उपयोग करतांना प्रथम आपण कुठे चुकत आहे व आपण किती पाण्यात आहोत हे पाहणे अगत्याचे ठरेल.—————–

सतीश देशमुख
मुख्य संपादक सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news