कारगील विजय दिवशी मणिपूर साठी युवापिढीने केली शांतीची मागणी
कारगील युद्धातील सैनिकाच्या पत्नीला निर्वस्त्र करून सामूहिक बलात्कार- मणिपूर
अकोला – कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने कुकी समुदायातील पिडीत महिलांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारकडून संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये शांतता आणि न्यायाची पुनर्स्थापना करण्यासाठी तात्काळ हस्तक्षेप करण्याबाबत अकोल्यातील युवापिढी ने जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी हे स्थानिक सरकारचे प्रतिनिधी या नात्याने या निवेदन द्वारे कळविले की मणिपूर हे राज्य जवळपास तीन महिन्यांपासून जळत आहे. मैतेई आणि कुकी समुदायातील संघर्षामुळे १५० पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. दोन्ही समुदायांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण गावे उद्ध्वस्त झाली आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत. या संघर्षामध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे २०२३ रोजी घडली आहे. मैतेई समुदायातील काही असंवेदशील जमावाकडून दोन कुकी आदिवासी महिलांना निर्वस्त्र करून धिंड काढण्यात आली. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले. त्यामधील एक महीला ही कारगील युद्धामधील सैनिकाची पत्नी होती. पिडीत महिलांच्या कुटुंबातील दोन पुरुषांची जमावाने हत्या केली. तेथील प्रशासनकडून यासंदर्भात कोणतीही कारवाई केली गेली नाही. एक व्हायरल व्हिडीओ मुळे हे सत्य पुढे आले आहे. परंतु हे अर्धसत्य असून अशा शेकडो महिलांना ह्या अत्याचाराच्या अग्नितून आजही होरपळून निघाव लागत आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेमुळे देशात वंचित समुदायातील व देशातील संपूर्ण महिलांच्या सुरक्षितता आणि प्रतिष्ठा पुन्हा एकदा देशात धोक्यात आली आहे. या निवेदनद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले की, तात्काळ वरील अमानवी कृत्यात सामील असलेल्या सर्वांना अटक करून त्यांच्यावर जलदगतीने कारवाई करावी. पिडीत महिला आणि प्रभावित समुदायास सुरक्षेसह त्यांचे पुनर्वसन करावे. महिला सन्मान, सुरक्षा आणि प्रतिष्ठा याला बाधा पोचविणाऱ्या मानसिकतेबाबत आपण कठोर पाऊले उचलावीत असे निवेदन अकोल्यातील अक्षय राऊत, गौरी सरोदे, आकाश पवार, दिक्षा गायकवाड, विकास जाधव, आदित्य ठाकूर, रुद्राक्ष राठोड, रश्मी गावंडे, गौरव डोंगरे, अमोल इंगोले, अमोल भटकर, रोहित जगताप, आदित्य पारसकर, ओम सरोदे, या युवापिढी ने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.
मणिपुर मध्ये ज्या दोन महिलांना नग्न करुन त्यांची धिंड काढली, सामूहिक बलात्कार केला. त्यामधील एक महिला ही कारगील मध्ये लढणाऱ्या सैनिकाची पत्नी होती. तेव्हा “मी देशाला वाचवले पण पत्नीला वाचवू शकलो नाही.” असे कारगिल मधील सैनिकाला म्हणावे लागत असेल तर ही बाब गंभीर आहे.
अक्षय राऊत