महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अकोला तर्फे बार्शीटाकळी तालुक्यातील खराब रस्त्या संदर्भात निवेदन दिले
बार्शीटाकळी तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि त्यामूळे सर्वसामान्य जनतेस होणारा नाहक त्रास यासाठी त्वरित कारवाही करण्यासाठी मनसे कडून सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन दिले असून बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा ते बार्शीटाकळी ,
कान्हेरी ते विझोरा, महान ते पातुर ,चिखलगाव ते चिंचोली रुद्रायणी, मांगुळ मिर्जापुर ते बार्शीटाकळी
हे संपूर्ण रस्ते हे खराब झाले असून त्यातले काही रस्ते हे मंजुरात झाले असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फतर्फे कुठल्याही प्रकारची काळजी न करता रस्त्याच्या कामामुळे जनता त्रस्त आहे रोज च्यासाठी होणारा शहराकडचा प्रवास करणे कठीण झाला असून ग्रामीण भागातील लोकांना त्याचा खूप त्रास होत आहे तरी या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात किंवा नवीन रस्ते बांधण्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या पाच दिवसाच्या आत कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष श्री पंकज साबळे ,जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीश फाले तालुका अध्यक्ष सचिन पाटील गालट, तालुका सचिव गजानन पाटील काळे, मनविसे तालुका अध्यक्ष वैभव पाटील कोहर, तालुका संघटक संदीप गोपनारायण ,शाखाध्यक्ष भूषण गावंडे, शाखा उपाध्यक्ष ऋषिकेश लाहोडकर यासह इतर मंसैनिकांनी दिले.