बार्शीटाकळी शहरालगतच्या विदृपानदीतील गाडगे बाबा आपत्कालीन पथकाने काढला मृतदेह.

बार्शीटाकळी शहरालगतच्या विदृपानदीतील गाडगे बाबा आपत्कालीन पथकाने काढला मृतदेह.

घटनास्थळ- विद्रुपानदी कालंका देवी मंदीर परीसरातील स्मशानभूमीच्या बाजुला बार्शीटाकळी जिल्हा अकोला.

27 जुलै रोजी दुपारी बार्शीटाकळीचे पो.उ.नि.निलेश तारक साहेब यांनी विद्रुपानदीत मृतदेह असल्याची माहिती पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले यावेळी लगेच आपले सहकारी मयुर सळेदार,अंकुश सदाफळे,क्रीष्णा वानखडे यांना सर्च ऑपरेशन साहीत्य घेऊन घटनास्थळी पाठविले आणी पो.उ.नि.निलेश तारक साहेब यांच्या उपस्थितीत लगेचच जलपटु स्विमर अंकुश दिपक सदाफळे याने नदीपात्रात उतरून मृतदेह बाहेर काढला मृतदेह हा अंदाचे तीन दिवसाचा असल्याची शक्यता आहे.यामुळे दुर्गंधी चा सामना करत मृतदेह वर आणला कव्हरींग साठी असलेले मयुर सळेदार,क्रीष्णा वानखडे यांनी सुरक्षीत स्थळी बाहेर घेतला यावेळी बार्शीटाकळी पो.स्टे.चे पोलीस उपनिरिक्षक निलेश तारक साहेब,पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव साहेब,पो.ह.राजु जोंधरकर,नापोशी.पंकज पवार, मंगेश महाजन,पो.शी. मनिष घुगे हे हजर होते. *मृतदेहाची ओळख पटली नसुन नागरिकांना ओळख पटविण्याचे आव्हान बार्शीटाकळी पोलीसांनी केले आहे. सदर मृतदेहाच्या अंगावर लाल रंगाचे फुलशर्ट त्यावर पांढ-या रंगाच्या जोडीदार ठीपके आणी साधा काळा पॅन्ट घातलेला असुन दाढी साधारण वाढलेली आहे.एका हातावर (GEETA) असे गोंधलेले नाव आणी एका हातावर (कीशोर) असे गोंधलेले नाव आहे.अशा वर्णनाचा हा मृतदेह कोणाच्या ओळखीचा असल्यास तात्काळ बार्शीटाकळी पोलीस स्टेशन जिल्हा अकोला येथे संपर्क साधण्याचे आव्हान पोलीसांनी केले आहे* अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news