पातूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापतीपदी राष्ट्रपाल गवई
वंचित बहूजन आघाडी ची पुन्हा एकदा सरशी
पातुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या उपसभापती निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रपाल गवई यांची सर्वानुमते बिनविरोध उपसभापतीपदी निवड करण्यात आली मागील महिन्यात झालेल्या सभापती उपसभापती निवडणूक मध्ये सभापतीपदी शिवसेनेचे अरुण कचाले तर उपसभापती पदी वंचितचे राजेश महल्ले यांची निवड झाली होती परंतु काही कारणास्तव वंचितचे राजेश महल्ले यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्याने उपसभापती रिक्त होते 28 तारखेला झालेल्या निवडणुकीमध्ये वंचित चे राष्ट्रपाल गवई राहणार सुकळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
दुसऱ्या वेळेस उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते कारण वंचितला पहिल्या वेळेस पद देऊ न ही वंचितच्या उपसभापती पदाच्या संचालकांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनामा नंतर राजकीय नाट्य तयार झाले होते वंचित बहुजन आघाडीचे राजेश महल्ले यांचे वडील श्री विष्णुपंत महले यांची दीर्घ सभापती पदाच्या कार्यकाळ तदनंतर त्यांनी माघार घेऊन राजेश विष्णुपंत महल्ले यांची संचालक पदी एन्ट्री आणि तालुकाभरातून संचालक मंडळामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले महले यांची सभापती पदासाठी वर्णी लागेल हा सर्वांचा नेम होता परंतु ऐनवेळी शिवसेनेचे श्री अरुण कचाले यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली आणि राजीनामा नाट्य नंतर महिनाभरातच दुसऱ्यांदा उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी पुन्हा वंचितला संधी मिळते का नाही असे चित्र निर्माण झाले होते.
परंतु पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वंचित ची सत्ता आबाधीत राहून ग्रामीण भागातील राष्ट्रपाल गवई यांच्या गळ्यात उपसभापती पदाची माळ पडली यावेळी खरेदी-विक्री संचालक श्री जगदीश भाऊ पाचपोर वंचित जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, वंचीत तालुका अध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ जी प उपाध्यक्ष सुनील फाटकर आणि अबुल हसन,चंद्रकांत अंधारे,बबन हांडे,गजानन ताले,मधुकर राठोड,पंजाबराव देशमुख, अजबराव लाहोले सुदेश पाकदुणे श्रीकांत ताले महादेव बांगर विजयाताई ताले पंचफुला राठोड, राजेंद्र देशमुख शंकर राठोड दीपक उजाडे सिंधुताई देवकते संगीता खोंड गोपाल महल्ले चरणसिंग चव्हाण माणिकराव तायडे गोटीराम चौरे राष्ट्रपाल गवई राजेश भाकरे अर्जुन टप्पे मोहसीन खान शेख मुख्तार इत्यादी संचालक तथा शरद सुरवाडे, राजू बोरकर, अनिल राठोड , दिनेश गवई,नितीन हिवराळे,अनिकेत इंगळे कर्मचारी अजय देशमुख,सुरेश अढाउ,किरण तायडे प्राधिकृत अधीकारी म्हणून आर एम जोशी यांनी काम पाहिले.