वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे-मुख्यमंत्र्यांना निवेदन

वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे-मुख्यमंत्र्यांना निवेदन

अकोट प्रतिनिधी

दिनांक 28 शुक्रवार रोजी वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ व्हावे , या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे .वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करण्याबाबत सहायक कामगार आयुक्त ( विकास ) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १७ डिसेंबर २०१ ९ ला शासनास अहवाल सादर केला आहे . त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे . महाराष्ट्र राज्य वृतपत्र विक्रेता संघटना ही राज्यातील तीन लाख वृत्तपत्र विक्रेत्यांचे संघटन करणारी एकमेव शिखर संघटना आहे . या संघटनेच्या माध्यमातून १५ वर्षापासून वरील विषयाचा पाठपुरावा सुरु आहे. वृतपत्र विक्रेत्यांचं कामाचे स्वरुप इतर कामापेक्षा भिन्न असून त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वातंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून लाभ दिले पाहीजेत अशी मागणी करण्यात आली असून वृतपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील सर्वच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापण करून मंडळ कार्यान्वीत करावे , वृतपत्र विक्रेते व या व्यवसायातील सर्वच कर्मचाऱ्यांची असंघटित कामगार म्हणून नोंद सुरु करावी ,आरोग्य , शैक्षणिक , पेन्शन आदी योजना ताबडतोब लागू कराव्यात , गटई कामगाराप्रमाणे मोक्याचे ठिकाणी पेपर स्टॉल उपलब्ध करून द्यावे . या मागण्या सदर निवेदनात नमूद केल्या आहेत .या दुर्लक्षित असलेल्या घटकांच्या प्रश्नाकडे लक्ष घालून अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला विषय मार्गी लावावा अन्यथा नाईलाजास्तव लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील महत्वाच्या घटकाच्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे निवेदन प्रकाश लक्ष्मणराव आम्ले महाराष्ट्र राज्य वुतपत्र विक्रेता संघटनेचे कार्यकारी सदस्य अकोला जिल्हा , नितीन खांडेकर अकोट तालुका अध्यक्ष, गणेश लोणकर कोषाध्यक्ष, सचिव भरत बंगाले , उपाध्यक्ष संजय कुलकर्णी ,मार्गदर्शक संजय जोशी , गिरीश कथले , संतोष विकणे , स्वप्निल सरकटे , कैलाश बुढळकर,गणेश अवचार ,जयंता कथले,प्रशांत ठोसर ,सतिश देशमुख , रविकांत पालखडे, आनंद शर्मा मुतलिम खान,जितेश गंगतिरे, विष्णू शर्मा, सरफराज खान, रितेश नाथे , गोपाल देशमुख, गोपाल हिंगणकर,या वेळी अकोला जिल्हा वुतपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी यांनी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news