अकोला महानगरपालिकेत महिला राज!

अकोला महानगरपालिकेत महिला राज!

महानगरपालिकेत दोन महिला उपायुक्त आता महानगरपालिकेच्या कामकाज आणखी होणार सुरळीत!

अकोला शासनाच्या नगरविकास विभागाने अमरावती जिल्ह्यातील दोन महिला अधिकाऱ्यांची अकोला महापालिकेत बदली केली आहे. त्यामुळे आता अकोला महानगरपालिकेत महिलाराज असणार अकोला महानगरपालिकेच्या कामकाज सुरळीत होणार आहे. या पहिले अकोला अकोला महानगरपालिकेचा कारभार मनपा आयुक्त कविता द्विवेदी या एकट्या महिला अधिकाऱ्यांनी पहात होत्या.

त्यानंतर मनपा उपायुक्त पदी नीला वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आता त्यानुषंगाने उपायुक्त गीता वंजारी आणि उपायुक्त गीता ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा पदभार शुक्रवार, २८ जुलै रोजी स्वीकारला आहे. महापालिकेत आयुक्त म्हणून महिला अधिकारी असून, शहर अभियंतादेखील महिला अधिकारी कामकाज पाहत आहेत. तर आता दोन महिला अधिकारी महापालिकेत नव्याने रुजू झाल्याने महापालिकेत महिलाराज आल्याचे बोलल्या जात आहे.

गीता वंजारी यांच्याकडे उपायुक्त प्रशासनासह सामान्य प्रशासन विभाग, विधी विभाग, लेखा विभाग, निवडणूक व जनगणना विभाग, शिक्षण विभाग नगरसचिव विभाग, संगणक विभाग, मध्यवर्ती भांडार विभाग, जन्म-मृत्यू व नोंदणी विभाग, अभिलेखा विभाग, अंतर्गत लेखा परीक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपायुक्त गीता ठाकरे यांच्याकडे उपायुक्त विकास यासह मालमत्ता कर व बाजार परवाना वसुली विभाग, क्षेत्रीय कार्यालय, पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग, स्वच्छता विभाग, वैद्यकीय आरोग्य व मलेरिया विभाग, पर्यावरण संवर्धन व उद्यान विभाग, समाजकल्याण व विकास विभाग, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय शहर अभियंता नीला वंजारी यांच्याकडे बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, मोटार वाहन विभाग तसेच नगररचनाकार तथा प्रभारी सहायक संचालक नगररचना आशिष वानखडे यांच्याकडे नगररचना व अनधिकृत अतिक्रमण व मालमत्ता था प्रभारी विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे आता मनपा मनपाच्या कामाला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कामाला गती मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news