मणिपूर घटनेच्या निषेध; वंचित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

मणिपूर घटनेच्या निषेध; वंचित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

केंद्रीय गृहमंत्री व मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

अकोट प्रतिनिधी

मणिपूर राज्यात कुकी या आदिवासी समाजाच्या महिलेची विवस्त्र धिंड काढून केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन गुरुवार दि.२७ रोजी करण्यात आले होते.यावेळी नारिशक्ती एकवटली व भाजप विरोधी नारे देत मणिपूरचे मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री यांच्या राजीनामाची मागणी मोर्चेकरांच्या वतीने करण्यात आली. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देखील देण्यात आले.

दोन महिन्यापासून मणिपूर राज्य जळत आहे. लेकीच्या बळींची अब्रू घेतल्या जात आहे. एकीकडे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ चे नारे या देशात सुरू आहेत.मात्र मणिपूरमध्ये वेळीच लक्ष घातले असते तर अशी लज्जास्पद घटना घडली नसती. कुकी महिलावर झालेल्या अमानवीय अत्याचाराने संतप्त झालेल्या वंचित आघाडीच्या वतीने स्थानिक पक्ष कार्यालय टॉवर चौक येथुन मोर्चा काढला.या मोर्चात
वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेश महासचिव अरूंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, जि. प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, अँड संतोश राहाटे,गजानन गवई, जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा उपाध्यक्ष कविता राठोड,जि.प सभापती आम्रपाली खंडारे, माया नाईक, रिजवाना परवीन,योगीता रोकडे, प्रतिभा अवचार, अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे, पातुर तालुकाध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ, तेल्हारा तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, दिपक बोडके,रुग्णसेवक नितीन सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा इंगळे, निता गवई, प्रमोदिनी कोल्हे, लिना शेगोकार, प्रगती दांदळे, मीना बावणे, सुष्मिता सरकटे, मिरा पाचपोर, प्रतिभा भोजने, स्फुर्ती गावंडे, सावित्रीबाई राठोड, मिनाक्षी उन्हाळे, रामकुमार गव्हाणकर, शंकरराव इंगळे, आकाश शिरसाट, विनोद देशमुख, सुशांत बोर्डे, अनंतराव अवचार, तालुका महासचिव शरद इंगोले, स्वप्निल सरकटे, संदीप आग्रे सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, महानगर तेलगोटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे आदी उपस्थित होते.
—————
भाजप विरोधी घोषणा

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित मोर्चात पदाधिकाऱ्यांनी भाषण करत भाजप विरोधी आक्रमक भूमिका घेत घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.शिवाय वंचित आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर हेच आदिवासी गोरगरीब समाजाचे नेते असून तेच वेळोवेळी अन्यायाविरुद्ध उभे राहतात असे देखील यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले.
————–
पोलिसांचा चोख बंदोबस्त!

मणिपूर येथील संवेदनशील घटना बघता राजकिय पक्षांचे मोर्चे एकाचवेळी एकाच ठिकाणी आले असतांना पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः साडेतीन वाजेपर्यंत बंद होती.यावेळी शहर उपविभागीय पोलीस अधीकारी सुभाष दूधगावकर तसेच आरसीपी, पोलीस, होमगार्ड जवान देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news