अकोट शहरातील प्रभाग क्र.१ मधील आझाद नगर येथील रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा
अकोट प्रतिनिधी
अकोट शहरातील आझाद नगर, हाजी नगर, गफूरवाला प्लॉट, तैमूर नगर या भागात कच्च्या रस्त्यावर सर्वत्र चिखल साचल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.याबाबत स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन मात्र मूकच पाळत आहे.गेल्या २ वर्षांपासून या कच्च्या रस्त्यांवर मुरुरम टाकण्यासाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. त्याबदल्यात नगर परिषद कडून आश्वासनां शिवाय काहीच मिळाले नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अजीम इनामदार व स्थानिक नागरिकांनी दि. २७जुलै रोजी जिल्हाधिकारी अकोला, उपविभागीय अधिकारी अकोट व मुख्याधिकारी अकोट नगरपरिषद यांना निवेदन देऊन हे रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शुक्रवार दि. ४ ऑगस्ट पूर्वी आझाद नगर, हाजी नगर, गफूरवाला प्लॉट, येथील रस्त्यांवर मुरूम टाकण्यात आले ,नाही तर सोमवार दि.७ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते अजीम इनामदार यांच्यासह स्थानिक महिला व नागरिक व ज्येष्ठ नागरिक यांच्यासह आझाद नगरच्या चिखलमय झालेल्या रस्त्यांवर चिखलात बसून आमरण उपोषण करणार आहोत. या उपोषणादरम्यान चिखलात बसल्याने नागरिकांच्या आरोग्याला काही हानी पोहोचली, तर त्याला प्रशासन जबाबदार राहील.
अशा आशयाचे नगर परिषदेला निवेदन देण्यात आले आहे.
प्रभाग क्र. १ हा अल्पसंख्याक बहुल परिसर असून गेल्या १५ ते २० वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव आहे.त्यामुळे शाळकरी मुले, गरोदर महिला, वृद्धांनाही या मार्गावरून चालणेही कठीण झाले आहे. स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत आहे का ,असा प्रश्न उपस्थित होत आहे.