पातुर शहरातील हुतात्मा स्मारकाची दैयनिय अवस्था
पातूर शहरातील जीर्ण झालेल्या हुतात्मा स्मारकाला देखभाल दुरुस्ती करिता माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर
पातूर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या मिलिंद नगर परिसरात गेल्या 40/45 वर्षा पूर्वी बनवलेल्या हुतात्मा स्मारक हे शहरातील एकतेचे प्रतीक दर्शविणारे असून आज या स्मारकाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे ही बाब लक्षात येताच मिलिंद नगर येथील रहिवासी माजी सैनिक प्रमोद खंडारे व सामाजिक कार्यकर्ते अमोल बागडे तसेच स्थानिक नागरिक यांनी पुढाकार घेऊन पातुर तहसीलदार काळे यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त अमरावती, अकोला जिल्हा अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी बाळापुर, तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या नावाने लिखित अर्ज सादर करून या हुतात्मा स्मारकाची देखभाल दुरुस्ती करिता मागणी केली आहे सध्या असलेली परिस्थिती बघता कुत्रे डुकरे जनावरे यांच्यापासू वाचविण्याकरिता याची देखभाल दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे स्मारकावर राष्ट्रीय चिन्ह व अशोक चक्र कोरलेले असून या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान होत आहे प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता हुतात्मा स्मारकाचे जीर्णोद्धार करावे अशी मागणी माजी सैनिक व सामाजिक कर्त्यांनी केली आहे