अकोल्यातील मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित असलेल्या नवीन घरकुल परिसरात एका 36 वर्षीय युवकांचा खदान तलावमध्ये डुबन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेख सलीम शेख सुबान वय 36 अस मृतकाच नाव आहे. शेख सलीम हा खदानमध्ये अंघोळ करण्यासाठी गेला होता अशी माहिती समोर आली आहे. आंघोळ करताना, युवकाचा तोल गेल्याने तो बुडाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.