प्रखर वक्तव्यामुळे प्रसिद्ध असलेले भिडे गुरुजी यांनी पातूर शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे केले पूजन
पातुर शहरात भिडे गुरुजी यांच्या आगमनाच्या वेळी एकी कडे विरोधाचा वारं तर दुसरीकडे स्वागताची धार असे समिश्र चित्र बघावयास मिळाले.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – महाराष्ट्र राज्यात आपल्या प्रखर वक्तव्याने प्रसिद्ध असलेले भिडे गुरुजी अखेर पातुर शहरातील संभाजी चौक येथील स्मारक असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्याने फुले शाहू आंबेडकर विचार वंत असलेल्या बहुजनांना दिलासा मिळाला आहे, यावेळी पातूर शहरातील भिडे गुरुजी समर्थक धारकरी यांनी गुरुजींना महात्मा ज्योतिबा फुले स्मारक येथे जाऊन पुजन करायचे म्हणून सांगितले असता भिडे गुरुजींनी महात्मा जोतिबा फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीशोधक असून पहिली शिवजयंती साजरी करणारे महापुरुष असल्याची त्यांनी सांगितले व धारकरी यांच्या मागणीला प्रतिसाद देत पातूर येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला भेट देऊन पूजन केले, या वेळी धारकरी विजय राऊत,ठाकुर शिवकुमार बायस,सुहास देवकर,पै मंगेश गाडगे,पवन तायडे,महेश बोचरे,प्रमोद श्रीनाथ,राजू उगले,पै बालू बगाडे,सचिन बारोकार,प्रविण इंगळे श्रीमती राधाबाई राऊत सह महिला मंडळ,तसेच बजरंगी ग्रुप चे सर्व कार्यकर्ते व ग्रामीण भागातून आलेल्या असंख्य धारक-यांनी उपस्थिती दर्शविली तर यावेळी पोलीस चोख बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.