महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका दक्षिण रेल्वे विभागाने घेतली दखल!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विधि विभागाच्या नेतृत्वात अकोला अकोट रेल्वे रस्ता दुरुस्ती करण्याबाबत शकडो प्रवासी, विद्यार्थी व्यापारी तसेच कर्मचारी जे अकोट वरून अकोला येथे हजारोच्या संख्येने अपडाऊन करतात परंतु त्यांना येण्याकरिता 40 मिनिटाच्या ऐवजी दीड ते दोन तास वेड लागतो त्याकरिता मनसेचे विधी विभागाचे राज्य सरचिटणीस एडवोकेट नंदकिशोर शेळके यांच्या नेतृत्वात सर्व विद्यार्थी प्रवासी वर्ग व्यापारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या विनंतीवरून रेल प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे नांदेड यांचे मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.रेल्वे अकोला रेल्वे स्टेशन मास्टर यांना देण्यात आले होते त्यामध्ये तात्काळ रेल्वे रस्त्याचे दुरुस्तीचे काम करा अन्यथा आंदोलन छेडू अशी धमकी मनसेच्या वतीने देण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनाची दखल घेत रेल प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे यांची सोबत एडवोकेट नंदकिशोर शेळके यांची सकारात्मक चर्चा झाली त्यामध्ये यश आले आणि आज रोजी अकोट अकोला रेल्वेरस्ता दुरुस्ती करिता काम सुरू झाले त्यामुळे अकोट मतदार संघ व इतर ग्रामीण भागातील प्रवासी वर्ग विद्यार्थी कर्मचारी वर्ग त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले जर मनसेचे राज्य सरचिटणीस एडवोकेट शेळके यांनी आंदोलनाची धमकी दिली नसती तर कदाचित अकोट अकोला रोड ना दुरुस्ती मुळे बंद पडला असता अगोदरच अकोला अकोट महामार्गाचे काम संतगतीने सुरू असल्यामुळे सर्व अकोट प्रभागातील व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जनता नाराजी सूर उमटत आहे तसेच गांधीग्राम चा पूल तुटल्यामुळे प्रवाशांचे व व्यापारी वर्ग व विद्यार्थ्यांचे हाल होते आहे. तसेच अपडाऊन कर्मचारी जे येणे जाणे करीत होते त्यांचे खूप हाल झाले. आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रेल्वे विभागाने दखल घेत काम सुरू केल्यामुळे सर्व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे मनसेचे सर्वसामान्य जनतेकरिता केलेले सामाजिक कार्य आहे असे एडवोकेट नंदकिशोर शेळके राज्य सरचिटणीस मनसे माहिती दिली आहे.