प्रभाग क्र. १३ मधील गोयनका लेआउट मध्ये बनले गायगाव येथील डम्पिंग ग्राउंड सारखे बनले मिनी डम्पिंग ग्राउंड !
आयुक्त घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी येताच स्थानिक नगरसेवक पडित वार्डाचे ठेकेदार लागले कामाला!
प्रभाग क्र. १३ मधील गोयंका लेआउट मधील रहिवासी भोगत आहेत नरक यातना!
प्रभाग क्र. १३ मधील गोयनका लेआऊट मधील असलेली पोतदार इंटरनॅशनल हायस्कुल समोरील गेल्या कित्येक वर्षापासून मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. मात्र याकडे स्थानिक नगरसेवक तसेच आरोग्य विभागाचे मनपातील कर्मचारी लक्ष नसल्यामुळे गोयनका लेआउट मध्ये बनले गायगाव डम्पिंग ग्राउंड सारखे मिनी डम्पिंग ग्राउंड ! बनल्यामुळे या परिसरातील नागरिक भोगत आहेत नरक यातना !
तसेच या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसा अगोदर आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मनपाआयुक्त घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक नगरसेवकांना तसेच मनपातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहित पडताच कधी न येणारे पडीत वार्डातील सफाई कर्मचारी पाहावयास मिळाले त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना स्वखदआचार्य व्यक्त होत आहे. मात्र वर्षभर हा कचरा तसाच पडून असतो. मात्र स्थानिक नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना हा कचरा उचलण्यास विरोध केला. सर्वप्रथम आयुक्त घटनास्थळी पाहणी केल्या नंतर आपण हा कचरा उचला अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच मनपा आयुक्तांनी प्रत्येक प्रभागात रोज जर पाहणी केली तर नक्कीच कचऱ्याची विल्हेवाट लागेल अशी मागणी अकोला महानगरातील सामान्य नागरिकांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून गोविंदका लेआउट मध्ये अतिशय घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संबंधीत घनकचरा विभागाने तेथील घनकचरा उचलण्याची व्यवस्था केलेली नसल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे आजुबाजुच्या सर्व नागरीकांनी गोविंद नगर, कृषि नगर येथील हा विषय मार्गी न लागल्यास गोविंद नगर, कृषि नगर येथील रहिवाशी नागरीक प्रशासनाने नोंद न घेतल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील. असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तरी घनकचरा विभागाने यावर लक्ष देवून यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.