गुन्हयातील आरोपीकडुन हस्तगत केलेला मुद्देमाल केला परत !
18 लाख 91 हजार 875 रु मुद्देमाल केला होता जप्त!
पोलीस अधीक्षक, अकोला संदीप घुगे यांचे संकल्पनेतुन अकोला जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. अंतर्गत दाखल गुन्हयातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करणेबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत अकोला जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर मोहिम राबविण्याबाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या होत्या..
त्याअनुषंगाने आज दिनांक ०१/०८/२०२३ रोजी अकोला जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर गुन्हयात आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहिम राबविण्यात आली असुन सदर मोहिमेदरम्यान एकुण १४ वाहने किंमत ८,३५,०००/-रु, मोबाईल फोन २३ किंमत ३,४२,९९४/- रु व सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रक्कम किंमत ५,२१,८८१/-रु. व ईतर मुद्देमाल १,९२,०००/-रू असा एकूण १८, ९१,८७५/-रु मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे. तसेच ग्राम निमकर्दा येथिल पोलीस पाटील रामदास शेंडे यांगा निमकर्दा बस स्टॉपवर १,०६,००० रु नगदी रक्कम असलेली बॅग मिळुन आली होती. त्यांनी ती बॅग पोलीस स्टेशन उरळ येथे जमा केली व पोलीसांनी ती कोणाची आहे याबाबत शहानिशा करून सदरची रक्कम ही राहुल शिरसाट शेगाव यांना पोलीस स्टेशन उरळ येथे बोलावुन शहानिशा करून ती रक्कम सुद्धा मुळ मालकास परत केली आहे. पोलीस पाटील यांनी केलेले कौतुकास्पद कार्याची दखल घेवुन त्यांचा मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे हस्ते योग्य ते बक्षीस देवुन प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल सम्मानित करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेळके, पोहवा. गोपाल मुकुंदे, पो. कॉ.गणेश पटवाड, कुंदन खराबे व सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी व पो.स्टे.चे मुद्देमाल मोहरर यांनी पार पाडली आहे. भविष्यात अशाच प्रकारे मोहिम राबवुन जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येत आहे.