लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शहरात शोभायात्रा.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शहरात शोभायात्रा काढण्यात आली. सार्वजनिक अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने अकोल्यात अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने महाराणा पार्क सिटी कोतवाली चौकातून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेच्या ग्रस्थानी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची फुलांनी सजवलेले प्रतिमा ठेवण्यात आली होती. वाजत-गाजत ही शोभायात्रा टिळक रोड, जुना कापड बाजार, जैन मंदिर, गांधी रोड, बस स्टॅन्ड, टॉवर चौक मार्गे रेल्वे स्टेशन रोड येथून रेल्वे स्टेशन चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पोहोचली. या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.