महानगरपालिका राबवि‍णार मेरी माटी मेरा देश उपक्रम. मनपा आयुक्‍त यांनी घेतली नियोजन बैठक.   

महानगरपालिका राबवि‍णार मेरी माटी मेरा देश उपक्रम. मनपा आयुक्‍त यांनी घेतली नियोजन बैठक.   

अकोला दि. 1 ऑगस्‍ट 2023 – आज दि. 1 ऑगस्‍ट 2023 रोजी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या व्‍दारे त्‍यांच्‍या दालनात ‘’आझादी का अमृत महोत्‍सव’’ च्‍या अंतर्गत ‘’मेरी माटी मेरा देश’’ या उपक्रमांतर्गत नियोजन बैठक घेण्‍यात आली आहे.

केंद्र शासनाच्‍या वतीने आजादी का अमृत महोत्सव 12 मार्च 2021 पासून सुरू झाला असून आता याच उपक्रमाची सांगता म्हणून ‘’मेरी माटी मेरा देश’’ मोहिमेची संकल्पना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून करण्‍यात आली आहे. या अभियानात शहरामध्‍ये वसुधा वंदन, शीला फलकम (स्मारक), पंचप्राण शपथ, अमृत वाटीका यासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अकोला महानगरपालिका व्‍दारा सदर उपक्रम 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत साजरा करण्‍यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. सदर अभियाना अंतर्गत राबविण्‍यात येणा-या उपक्रमांचा नियोजनाबाबत मनपा आयुक्‍त तथा प्रशासक व्दिवेदी यांनी विभाग प्रमुखांची नियोजन बैठक घेउन अभियान यशस्‍वीरित्‍या राबविण्‍याच्‍या सुचना विभाग प्रमुखांना दिल्‍या. तसेच यामध्‍ये  करण्‍यात येणारे कार्यासाठी विविध विभाग प्रमुखांना जबाबदारी सोपवि‍ण्‍यात आली आहे. ‘’मेरी माटी मेरा देश’’ या अभियानात शहरातील नागरिक, शासकीय/निमशासकीय व खाजगी आस्‍थापना शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्‍था यांनी उत्‍स्‍फुर्त सहभाग घण्‍याचे आवाहन मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी केले आहे.

यावेळी मनपाचे सहा.संचालक, नगर रचना आशिष वानखडे, सहा.आयुक्‍त पुर्व झोन क्षेत्रीय कार्यालय विजय पारतवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, प्रशासन अधिकारी अनिल बिडवे, एन.यु.एल.एम.चे गणेश बिल्‍लेवार, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, स्‍वच्‍छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, सहा.नगररचनाकार संदीप गावंडे, जलप्रदाय विभागाचे अभियंता नरेश बावणे, शैलेश चोपडे, संगणक विभाग प्रमुख हेमंत रोजतकर, मनपा मुख्‍य माळी गौतम कांबळे, संगणक विभागाचे शुभम अहिरकर, प्रसिध्‍दी अधिकारी भरत शर्मा आदिंची उपस्थिती होती.


मनपात साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती साजरी.   

अकोला दि. 1 ऑगस्‍ट 2023 – आज दि. 1 ऑगस्‍ट 2023 रोजी अकोला महानगरपालिकेच्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती निमित्‍त आयोजित कार्यक्रमामध्‍ये मनपा उपायुक्‍त गीता वंजारी आणि गीता ठाकरे यांच्‍या हस्‍ते साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून माल्‍यार्पण करण्‍यात आले.

          यावेळी महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, सहा.आयुक्‍त, पुर्व झोन क्षेत्रीय कार्यालय विजय पारतवार, स्‍वच्‍छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, साप्रविचे संजय खराटे, सुरेश पुंड, संजय चव्‍हाण, मंगेश जाधव, सुहास लडिंकर, पंकज देवळे, क्रिष्‍णा गेडाम, विश्‍वनाथ सुतवणे, पुरूषोत्‍तम इंगळे, गौरव ठाकरे, लता चोरपगार, गणेश वानखडे, प्रज्‍वल मलिये, शुभम देशमुख, विकास खंडारे, राजेश कोठारी, विकास जैन, प्रवीण क्षीरसागर आदिंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news