संभाजी भिडे विरुद्ध तात्काळ कारवाई करा- समता परिषदेची मागणी ..
अकोला – मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या वक्तव्यातुन वारंवार महापुरुषांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले व आता राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. मनोहर भिडे यांच्याकडून वारंवार महापुरुषांचा अवमान होत असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची संभावना आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनोहर भिडे यांच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यक्रमांवर बंदी घालावी असे आवाहन माजी आमदार म. फुले समता परिषदचे राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांनी केले. महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक मा. ना. छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले समता परिषद जिल्हा अकोलाच्या वतीन प्रा तुकाराम बिडकर यांच्या नेतृत्वात प्रा. सदाशिव शेळके, गजानन म्हैसने, श्रीराम पालकर, उमेश मसने, प्रा विजय उजवणे, महादेवराव साबे, माया इरतकर, ज्योती निखाडे, कल्पना गावारगुरू, अनिल मालगे यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन दिले. यावेळी मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी प्रा दिलीप आप्तुरकर,रामदास खंडारे, बाळकृष्ण काळपांडे, तुषार हांडे, वैभव टवलारे, किशोर सोनोने, देवानंद डहाके, बाळाभाऊ टाक, नानाभाऊ मेहर, आशिष निलखन, विनोद मानकर, भाऊराव पाटील, सुभाष वाईनदेशकर, महेंद्र बोळे,गणेश गोलाईत, अर्चना कोहरे, सुनीता वर्मा, सुरेश हाडोळे, कैलास इंगळे, दिनकर काकड, मंगेश घोडे, मुकेश इंगळे, अक्षय नागापुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.