शिर्ला खदान येथील किरणच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या.!
किरण कुमार निमखडे. सह निखिल इंगळे पातुर शहर प्रतिनिधी सत्य लढा न्यूज – शिर्ला खदान येथील किरण अर्जून बळकार या युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत फेकून देण्यात आला होता. किरणला न्याय मिळावा आणि तिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघ आणि ग्रामस्थांनी पातूर पोलिस ठाण्यात धाव घेत ठाणेदारांना निवेदन दिले.
किरण २७ जुलै दुपारपासून बेपत्ता होती. तशी तक्रार मुलीची आईने पातूर पोलिसां दिली होती. 29 जुलैला तिचा मृतदेह अंधारे कृषी महाविद्यालयाच्या क्रीडांगणाजवळच्या शेतातील काटेरी झुडपात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी गजानन सटवाजी बळकार याला अटक केली. या घातपाताच्या घटनेमध्ये अन्य आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करून उर्वरित सर्व मारेकऱ्यांना त्वरीत अटक करावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाने निवेदनातून केले आहे.
किरण कुमार निमखडे. सह निखिल इंगळे पातुर शहर प्रतिनिधी सत्य लढा न्यूज