श्री काशी कवळेश्वर मंदिर व श्री चक्रधर स्वामी मंदिर येथे जाण्याकरिता वाशिम रोड पासून वहीवाटीचा रस्ता पूर्ववत कायम ठेवणे बाबत निवेदन सादर
पातूर :-श्री काशी कवळेश्वर मंदिर व श्री चक्रधर स्वामी मंदिर येथे जाण्याकरीता वाशिम रोड पासून चा वहिवाटीचा रस्ता बंद न करणे बाबत आज समस्त पातुर( नानासाहेब) येथील शिवभक्त व पंचक्रोशीतील समस्त नागरिक यांनी प्रशासनाला विनंती करत निवेदन सादर केले आहे बोर्डी नदीच्या बाजूला सर्व पातुर नगरीतील शिवभक्ताचे आराध्य दैवत श्री काशी कवळेश्वर शिवमंदिर व श्री चक्रधर स्वामी मंदिर असून गावामधून भावी भक्तांना दर्शनाकरिता जाण्याकरिता पातुर वाशिम महामार्गावरून तहसील कार्यालयाच्या दक्षिण भागावरून पूर्व पश्चिम दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने श्री कवले यांच्या शेतामधून रस्ता दिलेला आहे चार चाकी तसेच दुचाकी वाहना करता व पायी जाण्याकरता हा एकमेव मार्ग आहे दोन्ही मंदिरे ही एकाच परिसरात असल्यामुळे गावातील व बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांची नेहमीच या ठिकाणी वर्दळ असते तसेच दररोज आणि विशेषतः श्रावण महिन्यात 400 ते 500 भक्तगण नियमित येतात आणि श्रावण महिन्यात कावड यात्रा उत्सव करिता भक्त गण हजारोच्या संख्येने या परिसरात जाणे येणे करतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा पंचकुशीतील हजारो संख्येने भक्तगण येणे जाणे करतात तसेच चक्रधर स्वामीचे वास्तव लाभलेले चक्रधर स्वामी चे मंदिर परिसरात असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी पण कित्येक लोक बाहेर गावातून तसेच गावातील दर्शनासाठी येतात तरी आपणास नम्र विनंती की सदर रस्ता बंद करण्यात येऊ नये जेणेकरून नागरिकांना अडचणीचे होईल सदर रस्ता हा वाशिम अकोला या मुख्य मार्गाला जुळून असल्यामुळे रहदारीच्या दृष्टीने नागरिकांना सोयीचा असल्यामुळे शासनाने या बाबीचा व जनतेचा विचार करून सदर रस्ता हा पूर्ववत कायम ठेवावा ही नम्र विनंती या वेळी समस्त शिवभक्त व शहरातील नागरिक उपस्थित होते.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा