महसूल सप्ताह निमित्त मसुरे मध्ये विविध दाखल्यांचे वितरण…..

महसूल सप्ताह निमित्त मसुरे मध्ये विविध दाखल्यांचे वितरण…..

मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम…

मसुरे प्रतिनिधी

महसूल सप्ताह निमित्त महसूल प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीम.वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे आर पी बागवे हायस्कूल येथे मसुरे मंडळ कार्य क्षेत्रात श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक तसेच ग्रामस्थांच्या विविध दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच महसूलच्या विविध योजनांची व कामकाजाची माहिती उपस्थित सर्वांना देण्यात आली..
यावेळी बोलताना मसुरेमंडल अधिकारी श्री सुहास चव्हाण म्हणाले महसूल सप्ताह मसुरे मंडल अधिकारी कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांनी संपन्न होत आहे. महसूल मधील सर्व वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही विद्यार्थी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला यांना मसुरे मंडळ महसूलच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्यात येईल. ग्रामस्थांना विविध दाखले सुलभरीत्या मिळण्यासाठी आपण व आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व महसूल कर्मचारी योग्य ते सहकार्य करणार आहोत. मसुरे मंडळ कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांनी महसूलच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असेही आव्हान यावेळी करण्यात आले.
यावेळी श्री.आर.एस.शेजवळ तलाठी त्रिंबक, श्री.एस.पी.लखमोड तलाठी देऊळवाडा, मसुरे सेतूचे नवनाथ गोसावी कोतवाल सचिन चव्हाण संतोष चव्हाण विश्वास पोळेकर डाटा ऑपरेटर प्रतीक्षा परब विनायक गावकर श्रीकांत खोत बागवे हायस्कूल प्राचार्य सौ अर्चना कोदे रमेश पाताडे श्री पिंगुळकर सर एस डी बांदेकर एन एस जाधव समीर नाईक,भानुदास परब, डी पी पेडणेकर, अनिल मेस्त्री, देऊळवाडा शाळा मुख्याध्यापक एस आर कांबळे, सौ मसुरेकर मॅडम, श्री चौगुले सर मसुरे महसूल कर्मचारी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ज्येष्ठ ग्रामस्थ व लाभार्थी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्याध्यापिका अर्चना को दे म्हणाल्यात मसुरे मंडळ अधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम केला असून याबाबत या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे यापुढेही त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असेच लोकाभिमुख कार्यक्रम हाती घ्यावेत.
यावेळी सर्व संबंधित कोतवाल, डाटा ऑपरेटर व सेतूचालक यांचे समवेत आर.पी.बागवे हायस्कूल मसुरे व भरतगड हायस्कूल देऊळवाडा या ठिकाणी विविध शैक्षणिक दाखल्यां चे वितरण व मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनेची माहिती मंडळ अधिकारी चव्हाण व सर्व तलाठी यांजकडून देण्यात आली.तसेच घरोघरी जाऊन शैक्षणिक व संजय गांधी अनुदान लाभाच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत देऊळवाडा येथे नवीन मतदार नोंदणीबाबत, मयत खातेदारांच्या वारस तपासाबाबत गाव नमुना नं.आठ अ चे वाचन तलाठी यांजकडून करण्यात आले. तसेच सलोखा योजनेबाबतची माहिती मंडळ अधिकारी मसुरे यांनी उपस्थितांना दिली.तसेच सदर कार्यक्रमाच्या वेळी सैनिक हो तुमच्यासाठी या सैन्यदलातील सैनिक तसेच वीरपत्नी यांची प्रलंबित प्रकरणे किंवा प्रश्न असतील तर अशा प्रकरणांबाबत दि.०५ ऑगस्ट रोजी मंडळ अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून चर्चा करण्यात येईल व त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news