मोर्णा नदीपात्रातील संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने काढला मृतदेह!

 मोर्णा नदीपात्रातील संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने काढला मृतदेह!

4 ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सिटी जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोर्णा नदीपात्रात एक इसमाचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना दिसल्यामुळे एकच खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार जुनेशहर पोलिस ठाण्याचे शशिकांत लेवरकर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ मृतदेह काढण्यासाठी पाचारण केले तेव्हा लगेचच पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे आणी अंकुश सदाफळे,प्रतिक गाडगे, हे घटनास्थळी दाखल झाले आणी अंकुश दिपक सदाफळे या जलपटु स्विमरने नदीपात्रातील मृतदेह बाहेर काढला तेव्हा सुरक्षित स्थळी आण्यासाठी अग्निशामक विभाग मनपा अकोला टीमचे वाहन चालक श्रीकृष्ण गाडगे, फायरमन राहुल वाकोडे,विजय, सोनोने,भुषण ठोसर,यांनी सहकार्य केले.यावेळी जुनेशहर पोलिस ठाण्याचे पिआय. लेवकर ,एपीआय.रविंद्र लांडे साहेब,सीटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक. वायदडे आणी जुनेशहर व सीटी कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.कर्मचारी उपस्थित होते.मृतकाच्या खीशात मिळालेल्या आधारकार्ड वरुन ते शे.आसीफ शे.हुसेन रा. गवळीपुराहा मृतदेह गवळीपुरा डीग्रस जिल्हा यवतमाळ येथील असल्याचे समजते

अशी माहिती पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news