बाबूजी देशमुख वाचनालय द्वारा आयोजित लोकमान्य टिळक स्मृती वक्तृत्व स्पर्धा

बाबूजी देशमुख वाचनालय द्वारा आयोजित लोकमान्य टिळक स्मृती वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातुन स्कूल ऑफ स्कॉलर्स चा स्मित सचिन भोयर व महाविद्यालय गटातुन आर एल टी ची मृणाली गालफाडे ठरली रनिंग ट्रॉफी ची मानकरी
—————————————
अकोला—बाबूजी देशमुख वाचनालय अकोलाचे वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त शालेय गटासाठी ‘लोकमान्य टिळक यांचे जीवन व कार्य ‘ तर महाविद्यालय गटासाठी ‘आजचे राजकारण व लोकमान्य टिळक ‘ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शालेय गटातुन स्कूल ऑफ स्कॉलर्सचा विद्यार्थी स्मित सचिन भोयर हा प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला.त्याने शाळेला२०२३ची रनिंग ट्रॉफी मिळवुन दिली.तर महाविद्यालय गटातुन आर एल टी विज्ञान महाविद्यालयाची कु. मृणाली गालफाडे प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली . तिने महाविद्यालयाला रनिंग ट्रॉफी मिळवून दिली. शालेय गटातून द्वितीय पारितोषिक- कु.गार्गी रवींद्र पवार (मोहरीदेवी खंडेलवाल कन्या शाळा), तृतीय पारितोषिक- कु. मंजिरी मोरे( सन्मित्र पब्लिक स्कूल अकोला )तर महाविद्यालय गटातून द्वितीय पारितोषिक-आनंद शिवशंकर महल्ले( सिताबाई कला महाविद्यालय), तृतीय पारितोषिक- कु. निकिता दुबे(नथमल गोयनका लॉ कॉलेज अकोला ).या स्पर्धकांना बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांचे हस्ते स्मृतीचिन्ह-पारितोषिक देवुन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन माजी प्राचार्य डॉ. रामप्रकाश वर्मा, प्रा.बबनराव कानकिरड व प्रा. डॉ. अरविंद काटे यांनी काम पाहिले .कार्यक्रमाचे प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले. बाबूजी देशमुख वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र ,कोषाध्यक्ष व्ही.एन.ठाकुर व सदस्य प्रविण वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. बबनराव कानकिरड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबूजी देशमुख वाचनालयाचे कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी पालक शिक्षक व श्रोते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news