नऊ गोवंशाना पोलिसांनी दिले जीवदान, मुर्तिजापूर पोलिसांची कारवाई !
दोन जणांन विरुद्ध गुन्हा दाखल
तिन लाखांचा ऐवज हस्तगत
संजय तायडे तालुका प्रतिनिधी सत्य लढा न्यूज अकोला – मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर एका मालवाहू चारचाकी वाहनातून अवैधरित्या गोधन जात असताना पोलिसांनी सापळा रचून सदर वाहनातून ९ गोवंश ताब्यात घेऊन जीवदान दिले, दोन जणांन विरुद्ध गुन्हा दाखल केला,हि कारवाई शणिवार सकाळी दरम्यान केली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुर्तिजापूर कडून अकोला कडे एका मालवाहू गाडी क्रंमाक एम एच 30 बी डी ४३३५ या वाहनातून अवैधरित्या निर्दयपणे कोंबुन बांधुन अवैधरित्या ९ गोधन वाहतूक करुन जात होते, दरम्यान ही माहिती मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना मिळाली वरुन ठाणेदार सुरेंद्र राऊत, पोलिस उपनिरीक्षक पाटील सर,यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दिपक कानडे , रडके, तायडे,सुदाम, नितीन सह पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून सदर वाहनातून अवैधरित्या गोधन वाहतूक करुन अवैधरित्या कत्तल करीता जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले वरुन सदर गाडी सह गोधन ताब्यात घेऊन रिजवान उर रहेमान,शेख रहीम या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध प्राणी स्वरक्षण कायदा अंतर्गत विविध कल्मान्वे गुन्हा दाखल केला गाडी सह गोधन असा एकुण तीन लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, पुढील तपास मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दिपक कानडे ,सह पोलीस करत आहेत.