आकाश म्हस्के हत्याप्रकरणी आरोपी अटक!
काटेपूर्णा नदीपात्रालगत असलेल्या विहिरीत फेकून दिला होता मृतदेह!
अकोला – बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील जांभा गावानजीक काटेपूर्णा नदीपात्रालगत असलेल्या विहिरीत एका २५ वर्षीय युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. हत्या करण्यात आलेल्या युवकाच्या ‘डीएनए’ रिपोर्टवरून उलगडा झाल्याने या हत्या प्रकरणाची एकानंतर एक कडी उलगडत गेली. या प्रकरणातील आरोपी रोहित जाधव यास मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधून अटक केली आहे. पिंटू ठोंबरे व तेजस हिंगणकर या दोन आरोपींना अटक केली. सदर तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.