माहामार्गावर कारच्या धडकेत दोन दुचाकी स्वार ठार !
वाशिंबा नजीकची घटना
संजय तायडे तालुका प्रतिनिधी सत्य लढा बोरगाव मंजू – राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नजीक भरधाव कारच्या धडकेत दोन दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना शणीवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी दरम्यान घडली, प्रशांत गावंडे, मिलिंद इंगळे असे अपघातातीलने मृताचे नाव आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू कडून अकोला कडे आपल्या दुचाकी क्रंमाक एम एच 30 ए के 8291 दुचाकीवरून प्रशांत बाबाराव गावंडे वय 43 बोरगाव मंजू, मिलिंद अंबादास इंगळे वय 38 तापडिया नगर अकोला हे दोघे बोरगाव मंजू वरुन अकोला कडे जात होते, दरम्यान पाठीमागून येणाऱ्या कार क्रंमाक एम एच 36 एच 1451 या कारने समोरच्या दुचाकीस पाठीमागून जबरदस्त धडक दिल्याने समोरचे दुचाकीस्वार प्रशांत गावंडे,मिलिंद इंगळे, हे या अपघातात गंभीर जखमी झाले, दरम्यान एकाचा घटस्थळी मृत्यू झाला तर एकास गंभीर जखमी यास आपली ड्युटी वरुन घरी परत अकोला येथे जात असताना हेडकॉन्स्टेबल योगेश काटकर यांनी कशासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना मृत्यू झाला, दरम्यान सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार मनोज केदारे, हेडकॉन्स्टेबल गोपाल राठोड, हेडकॉन्स्टेबल इरफान शेख, अनिल अंबुलकर, गिरीश विर, यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला, दरम्यान सदर चारचाकी कार वाहना सह ताब्यात घेऊन पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे सह पोलीस करत आहेत.