पातूर शहरातील विकास कामे मार्गी लावा – सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बायस
पातूर शहराच्या विविध प्रकारच्या विकास कामांना मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. – मुख्याधिकारी सैय्यद एहसानोद्दीन
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा
पातूर : – पातूर नगरपरिषद हद्दीतील विविध प्रकारचे विकास कामे मार्गी लावण्यासाठी पातूर तालुका विकास मंचाच्या वतीने पातूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी सैय्यद एहसानोद्दीन यांना निवेदन देण्यात आले.
शहरात राहणा-या कष्टकरी शेतकरी असलेल्या सामान्य नागरिकांना आरोग्याच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. नागरिकांच्या आरोग्य विषयक असणा-या अडचणी दूर करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने गेल्या काही वर्षांपूर्वी पातूरसाठी ग्रामीण उप जिल्हा रूग्णालयाला मंजुरी दिली आहे.परंतु त्यासाठी आजूनही जागेची निश्चिती न झाल्याने हा प्रकल्प रखडला आहे यासाठी हा प्रकल्प उभारण्यासाठी योग्य कार्यवाही करून नागरिकांच्या सेवेसाठी रूग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे.
नगरपरिषद शाळा क्रमांक २ च्या पातूर बाळापूर रोडलगत व संभाजी चौक ते महाराणा प्रताप चौक रोडलगत शाळेच्या आवारात व्यवसायिक दुकानांचे गाळे स्वतः नगरपरिषद च्या माध्यमातून किंवा बीओटी तत्त्वावर (बांधा व वापरा) उपलब्ध करून देण्यात यावे.
शहरातील नगरपरिषदेचे ओस पडलेल्या उद्यानाची नव्याने निर्मिती करून शहर सौंदर्यीकरणात भर घालावी.प्रायोजिक तत्त्वावर शहरातील मुख्य चौकांचे शुशोभिकरण करण्यात करणे, शहरातील सरकारी विहिरी तसेच खासगी सर्व विहिरीत जंतूनाशक पावडर उपलब्ध करने तसेच नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी आठवड्यात तीन वेळा उपलब्ध करून देणे अशा प्रकारच्या मागण्या नगरपरिषदचे मुख्याधिकारी सैय्यद एहसानोद्दीन यांच्याकडे करण्यात आल्या.यावेळी त्यांनी त्यांच्या अधिका-यांसोबत पातूर तालुका विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी बैठकीला मुख्याधिकारी सैय्यद एहसानोद्दीन,आरोग्य विभाग प्रमुख महेश राठोड, कार्यालय अधिकारी भगत साहेब,पातूर तालुका विकास मंचाचे प्रमुख ठा.शिवकुमारसिंह बैस, सुहास देवकर,डॉ.विलास हिरळकार,विजय राऊत,रामेश्वर वाढी ,कार्तिक डिके,सतिश वानखडे,मधूकर राखोंडे यांसह इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.