माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

मनोज भगत – तालुका प्रतिनिधी तेल्हारा – स्थानिक माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर विद्यालयामध्ये विविध शालेय उपक्रमातर्गंत विविध स्पर्धा परीक्षेचे नियमित आयोजन होत असते याच निमित्याने विद्यालयामध्ये गीत गायन या स्पर्धेचे आयोजन २८ जुलै ला केले होते माध्यमिक विद्यालयात झालेल्या गीत गायन स्पर्धेमध्ये विद्यालयातील सर्वच मुलींनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये शाळेतिल इयत्ता ९ ची विद्यार्थिनी रिया नागपुरे व १० वी ची विद्यार्थिनी प्रेरणा सावळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच ग्रुप गायन मध्ये वर्ग नववीच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकाविला शाळेमध्ये दि.४ ऑगस्ट रोजी बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन केले होते,प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन लाभले माध्यमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सावळे मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बाजारे मॅडम शिंगोकार मॅडम विशाखा सातारकर मॅडम उपस्थित होते.या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्राप्त यशाचे मान्यवराच्या हस्ते बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य देऊन कौतुक करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी वानखडे व आचल वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवम निमकर्डे यानी केले.यावेळी वेळी राजेंद्र वाघोडे,अमोल ताठे,नितीन वानखडे,विवेक ढोकणे,हर्षल सोळंके वैभव काळपांडे राहुल गिऱ्हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news