9 ऑगस्ट रोजी घरकुल मिळण्याकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव सेनेचा भव्य मोर्चा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये घरकुल देण्याची घोषणा केली होती मात्र 2023 लागल्या वरही घरकुल लाभार्थी वंचित !- आमदार नितीन देशमुख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरकुल देण्याची घोषणा केली होती. मात्र 2023 आले तरी घरकुल लाभार्थ्यांना घरकुला पासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडत आहे. असे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली. ते पुढे बोलाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वचन दिले होते. प्रत्येकाला पक्के घर. घरामध्ये नळ. घरामध्ये इलेक्ट्रिक मीटर दिले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने पात्र यादी केली होती. त्यामध्ये 50 हजार घर मंजूर केली होती. त्यामध्ये फक्त पाच हजार लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता नवीन बस स्टॅन्ड चौक येथून भव्य मोर्चा काढणार असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली. तसेच घरकुला पासून वंचित असणाऱ्या नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आमदार नितीन देशमुख यांनी केले आहे.