शिर्ला येथे वंचित बहुजन आघाडी पातूर तर्फे पीडितेच्या परिवाराला आर्थिक मदतीचा हात…
निखिल इंगळे सह किरण निमकंडे – पातुर : शिर्ला आज दि.6 ऑगस्ट 2023 रोजी शिर्ला येथील अत्यंत गरीब कुटुंबं मोलमजुरी व उदरनिर्वाह करून जगणाऱ्या पाथरवट समुदायाच्या परिवारातील झालेल्या किरण अर्जुन बळकार १९ वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्याकांडा च्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांच्या आदेशाने आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा तर्फे सदर परिवाराला ३० हजार रोख रुपयाची मदत व ६ हजार रुपयाचा दैनंदिन किराणा अशी एकून ३६ हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी प्रमोद देंडवे जिल्हाध्यक्ष, मिलिंद इंगळे जिल्हा महासचिव, प्रभाताई शिरसाट जि.अध्यक्षा महिला आघाडी, संगीताताई अढाऊ जि.प.अध्यक्षा, डॉ. ओमप्रकाश धर्माळ तालुकाध्यक्ष, सुनील फाटकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष,आम्रपालीताई खंडारे सभापती समाज कल्याण, योगिताताई रोकडे कृषी सभापती, मायाताई नाईक शिक्षण सभापती,पुष्पाताई इंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, शरद सुरवाडे तालुका महासचिव, अर्चनाताई डाबेराव तालुका अध्यक्षा महिला, इमरान खान मुमताज खान पं.स उपसभापती , राजू बोरकर तालुका संघटक, दिनेश गवई तालुका प्रसिद्धी प्रमुख,राणा डाबेराव,निखिल खंडारे, दादाराव इंगळे, वाय.एस. इंगळे,गिरीष टप्पे,रेखाताई गवई, लक्ष्मण ढाळे,उमेश ढाळे,शाम खर्डे, बंडू कोकणे,काशिनाथ काळे,भिकाभाऊ ढाळे,अर्जुन बळकार,बाबुराव बळकार इत्यादी उपस्थित होते.