10 दिवसांच्या आत शेतीउपद्रवी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– वंचित बहुजन आघाडी
अकोट प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलींद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, अकोला जिल्ह्यात वनविभागाची विविध राखीव कुरणे आहेत. अश्या राखीव जंगलात विविध वन्य प्राणी जसे रानडुक्कर, हरीण, कोल्हे, नीलगाय ई. यांचा अधिवास आहे. सदर प्राणी रात्रीचे वेळी या जंगलातुन बाहेर येऊन आजूबाजूच्या विविध गावांच्या शेत शिवारांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करतात. सदर प्राणी अनेकदा शेतकऱ्यांचा सामना झाल्यास त्यांच्यावर हल्ला सुद्धा केल्याच्या घटना सतत घडत असतात. या प्राण्याच्या दहशतीमुळे शेतकरी विविध नगदी पिके जसे की हरभरा, मुग, उडीद, तुर, सोयाबीन पिकवण्यास असमर्थ आहेत. अशाप्रकारच्या वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून खुप जास्त शेती उपज नुकसानीला सामोरे जावे लागत आहे व परिणामतः शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य हरवत चालले आहे. तरी सदर आजतागायत शेजाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने त्वरित करावी.
तरी या निवेदनाद्वारे आम्ही आपणास नम्र विनंती करतो की आपण वन विभागाची विशेष पथके तयार करून सदर प्राण्यांना पकडुन जवळच असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये किंवा सोयीनुसार इतरत्र कायमस्वरूपी पूर्णतः स्थलांतरित करावे व शेतकऱ्यांना 90% अनुदानावर शेतीकरिता तारेचे कुंपण उपलब्ध करून देण्यात यावे. सदर मागण्या येत्या 10 दिवसांत पुर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा तर्फे तीव्र ते अती तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व परिणामी होणाऱ्या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जि. प. अध्यक्ष संगीताताई अढावू, जि. प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, शिक्षण सभापती मायाताई नाईक, समाजकल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे, कृषी सभापती योगीताताई रोकडे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य पुष्पाताई इंगळे, जि. प. सदस्य पुष्पाताई इंगळे, माजी मनपा गटनेते गजानन गवई, ओबीसी नेते ॲड संतोष राहाटे, माजी जिल्हा महासचिव राजुमियॉ देशमुख, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, अकोला पश्चिम तालुका कार्याध्यक्ष पवन बुटे, अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे, अकोला पश्चिम तालुकाध्यक्ष देवराव राणे, बाळापूर तालुका महासचिव चंद्रकांत पाटील, निखील गावंडे, सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, जिल्हा उपाध्यक्ष कविता राठोड, जिल्हा महासचिव शोभाताई शेळके, रोशन पुंडकर, युवा उद्योजक कश्यप जगताप, अत्यल्प समाज संघटनेचे अध्यक्ष गोपाल राऊत, माजी जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे अकोट तालुका प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सरकटे, दिपक बोडखे,संदिप सरनाईक, संजय बुथ, शंकरराव राजुस्कर, प्रभाकर चक्रे, मधुकर गोपनारायण, किसन सोळंके, युवराज मुरकुटे, राजेश मोरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड, संदिप आग्रे, सुरेंद्र ओईंबे,कृपया मीनाताई बावणे व निताताई गवई प्रमोदिनीताई कोल्हे, मंदाताई वाकोडे, जनार्दन गवई, गौतम पचांग, अभिजीत गावंडे, शुध्दोधन इंगळे, मुर्तीजापुर तालुकाध्यक्ष सुनिल सरदार, सिध्दार्थ गवारगुरू, पवन आढे, प्रविण वाहुरवाघ, भगवान चक्रनारायण,सैय्यद सादिक, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जामोदे, नितेश गोपनारायण, अमोल भगत यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सह्या केल्या आहेत.