२ मजली इमारत पूर्णपणे कोसळली कुठलीही जीवितहानी नाही!
सदर इमारत पडत असतानाचा व्हिडिओ फक्त सत्य लढा कडे..!
मालेगाव: मालेगाव शहरातील शिव चौकात असलेली जुनी दुमजली इमारत सोमवारी सकाळी 10 वाजता अचानक कोसळली, या इमारतीमध्ये कोणीही राहत नसल्याने जीवित हानी तळली इमारत पडल्याने कोणीही जखमी झाले नाही. या इमारतीसमोरील पानपट्टी मात्र ढिगाऱ्याखाली दबून पुर्णपणे उध्वस्त झाली आहे.
सोमवारी सकाळी 10 वाजता अचानक इमारत कोसळल्याने खळबळ उडाली होती. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच मालेगावचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले, शिव चौकात असलेली मुंदडा कुटुंबीयांच्या मालकीची इमारत सुमारे 60 ते 70 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येते. ही इमारत पिलर माती विटांनी बनविण्यात आली होती.
पावसाळ्यात इमारतीची जीर्णता लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासना द्वारे नोटीस देण्यात आली होती.
जेसीबी मशीनने इमारतीचा ढिगारा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
मालेगाव तालुका प्रतिनिधी सोयल पठाण