माझा पाल्य हुशार आहे का ? या कार्यशाळेचे सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे यशस्वी आयोजन
मनोज भगत
तेल्हारा ता प्रतिनीधी
हिवरखेड येथील अग्रगण्य व नामांकित शाळांपैकी एक शाळा असलेल्या सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे ADHD या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या अनेक अडचणी व त्यांना अभ्यासामध्ये येत असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी करण्यात आले होते यामध्ये अवधान, अस्थिरतl, आंतरक्रियाशीलता विकृती या विषयावर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर यांनी पालकांना सखोल असं मार्गदर्शन केले.
मुलांना लिहिता वाचता न येणे म्हणजे डिसग्राफिया याची काय कारण आहेत व त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो? यासंबंधी पालकांना मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर डिसक्लेसिया म्हणजे गणितीय क्रिया करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्यावर सुद्धा त्यांच्या अडचणी जाणून त्यावर उपाययोजना कशा पद्धतीने करायच्या याचं मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला शंभरच्या वर पालकांची उपस्थिती होती या कार्यक्रमांमध्ये पालकांना मुलाविषयी ज्या काही समस्या घरी जाणवत असतील त्याची सुद्धा उत्तरे पालकांना देण्यात आली. शाळा सुरू झाल्यापासून पालकांच्या आपल्या पाल्याबद्दल अनेक अडचणी ह्या शिक्षकांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांपर्यंत जात होत्या त्यावर काय उपाययोजना आपण करू शकतो यासाठी या कार्यशाळेचा आयोजन करण्यात आलेलं होतं ही कार्यशाळा संपूर्ण रित्या मानसशास्त्रावर आधारित होती यामध्ये विद्यार्थ्यांच्या सायकॉलॉजीचा विचार करून त्याच्याशी आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, त्याच्याशी आपण कसं बोललं पाहिजे, त्याचे कोणते हट्ट पुरवले पाहिजे, त्याच्या कोणत्या मागण्या आपण मान्य केल्या पाहिजेत, कुठपर्यंत आपण त्याच्या निर्णयामध्ये सहभागी झालं पाहिजे, कुठपर्यंत आपण त्याला सपोर्ट करायचा, कुठे त्याला एकटं सोडायचं, कुठे त्याच्या सोबत जायचं, कुठे त्याला आपल्या आधाराची गरज आहे, कुठे त्याला एखादा निर्णय घेऊ द्यावा या सगळ्या गोष्टींचा विचार करून या कार्यशाळेचा आयोजन करण्यात आले होते.पालकांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया या कार्यशाळेबद्दल दिल्या आहेत. पालकानीशिक्षकांनी संवाद साधला तेव्हा पालकांच्या प्रतिक्रिया फार सकारात्मक होत्या की निदान आता त्यांना हे सुद्धा कळलेल आहे की घरी गेल्यावर आपल्या पाल्याची आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे त्याच्याशी कसा संवाद साधला पाहिजे त्याच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये काही फरक आपल्याला जाणवतो आहे का अगोदर घरी कसा होता आता त्याच्या वागण्यामध्ये काय फरक आहे या सगळ्या गोष्टींमधला बदल पालकांना जाणू लागला आणि पालक शाळेबद्दल सुद्धा सकारात्मक असल्याचं लक्षात आलं. दर दोन महिन्यातून एकदा अश्या कार्यशाळlचे आयोजन करावं असं सुद्धा पालकांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये सुचवला आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमल येऊल मॅडम यांनी केले व कार्यक्रमाकरता शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.