महसूल सप्ताह निमित्त वृक्षारोपण पुनर्वसित आदिवासी गाव नई तलई येथे जनसंवाद
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
अकोट उपविभागातील तेल्हारा तहसील अंतर्गत येणाऱ्या पुनर्वसित आदिवासी गाव नई तलई येथे महसूल सप्ताह निमित्त जनसंवादकार्यक्रम दि. ४ऑगस्ट ला संपन्न झाला. जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत तेल्हारा तालुक्यात महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. नई तलई येथे आयोजित जनसंवाद सभेत अकोट उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर,गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतंडे, यांनी उपस्थित राहून येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर तोडगा काढत विविध शासकीय योजनांची माहिती दिली.महसूल सप्ताहात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक कामसमन्वयाने पूर्ण करून,सप्ताहातील उपक्रमांबाबत जन जागृती करीत नागरिकां पर्यंतमाहिती पोहोचवावी व त्यांनाआवश्यक सेवा उपलब्ध करूनदेण्याच्या सूचना अकोला येथील जिल्हाधिकारीअजित कुंभार यांनी दिल्याहोत्या. महसूल सप्ताह निमित्त तेल्हारा तहसीलकार्यालया कडून स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा परिसरात वृक्षा रोपण करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित केले.सभेसाठीग्रामपंचायत सरपंच संजय भिलावेकर, समाजसेवी मुन्ना ठाकरे, गावातील नागरिक उपस्थित होते. सभेचे संचालन अध्यापक तुळशिदास खिरोडकार यांनी तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी संजय साळवे यांनी केले. सभेच्या यशस्वीतेसाठी मुख्या ध्यापक राजेश आमले, अध्यापक गोपाल मोहे, मंडळ अधिकारी संजय साळवे, तलाठी सतीश ढोरे,कृषी सहाय्यक सतीश राजनकर यांनी पुढाकार घेतला.