पातूर पोलीस स्टेशन चौकात समान नागरी कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे आंदोलन
महात्मा फुले स्मारक संभाजी चौक पातूर येथे आदिवासी समाजातील महिलांसह मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – पातूर शहरातील व ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील विविध संघटनांनी सहभागी होऊन समान नागरी कायदा विरोधात तसेच मणिपूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने भव्य प्रमाणात सहभाग घेऊन शासन निर्णय समाण नागरिक कायदा विरोधात तसेच मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आज भारत बंद आंदोलन पुकारले होते याचे पडसाद पातूर शहरात दिसले त्यावेळी पातुर तालुक्यातील व शहरातील आदिवासी समाज तसेच महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष सुरेंद्र उगले, व प्रितम खुळे यांनी महात्मा फुले स्मारक येथे या मोर्चाला हिरवी झेंडी दाखवून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला यावेळी पातूर शहरातील मुख्य मार्गावर संभाजी चौक पोलीस स्टेशन चौक पर्यंत मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला व पोलीस स्टेशन चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आले यावेळी मोर्चामध्ये आदिवासी समाजातील विविध संघटना सामील झाल्या त्यामध्ये, बा.म.से. फ बिरसा उल गुलान सेना , बिरसा क्रांती दल, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, भारतीय अस्मिता आदिवासी संघटनेंनी परिश्रम घेतले.