गृहमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्यात वाढले खून दरोडे चोऱ्या चे सत्र
मात्र पोलीस प्रशासन कुंभकर्णी झोपेत!
दरोड्याचे अनेक तपास अद्यापही प्रलंबित!
गेल्या काही महिन्यांपासून अकोल्यात गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत एकाच दिवशी चोरीच्या दोन घटना 7 ऑगस्ट रोजी रात्री 9.15 च्या सुमारास फतेहपूर वाळी रोड, मोठी उमरी कॉम्प्लेक्स, निशाण बँक च्या शाखेजवळ, रत्नपारखी ज्वेलर्स, चे संचालक ज्वेलर्स बंद करून बॅगेत रोकड व काही सोने-चांदीचे साहित्य घेऊन घरी जात होते, तेव्हा दुचाकीवरून आले. चौर याने त्याच्याकडील लाखो रुपयाचा माल तसेच रोकड बॅग हिसकावून पळ काढला, या घटनेची माहिती पोलीस विभागाला दिल्यानंतर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले व पुढील कारवाई सुरू केली, अद्यापपर्यंत गुन्हेगारांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तर दुसरीकडे रामनगर येथील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पळून नेण्याची घटना सुद्धा याच दिवशी घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोला शहरात नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा चोरीच्या तसेच खून दरोडा च्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. विशेष म्हणजे गृहमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्यात वाढले खून दरोडे चोऱ्या चे सत्र अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात , गुंडगिरी, चोरी अशा अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून,दरोड्याचे अनेक तपास अद्यापही प्रलंबित! आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.