नगरपरिषद पातूर येथे “मेरी माटी मेरा देश” कार्यक्रमासाठी बैठक संपन्न
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – पातूर – देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत वर्ष महोत्सव साजरा होत असताना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाची माहिती अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर नगरपरिषद येथे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सैय्यद एहसानोद्दीन यांनी अतिशीघ्र पणे पातूर नगरपरिषद हद्दीत राहणारे सर्व स्वातंत्र्य सेनानी,माजी सैनिक,माजी उपाध्यक्ष नगरपरिषद,माजी नगरसेवक,नगरसेविका, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी,सर्व पक्षाचे शहर प्रमुख,पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील संघटनांचे प्रमुख पदाधिकारी,तसेच शहरातील काही प्रतिष्ठित व सामान्य नागरीक यांना नगरपालिकेच्या सभागृहात “मेरी माटी मेरा देश” या नाविण्यपूर्ण उपक्रमाबद्दल पीपीटी च्या माध्यमातून प्रोजेक्टरच्या सहाय्याने उपस्थितांना समजेल अशा सोप्या व सोईस्कर पद्धतीने माहिती दिली व यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी डेमो सादर करून या अभियानात शहरातील प्रत्येक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आव्हान मुख्याधिकारी सैय्यद एहसानोद्दीन यांनी केले आहे.
मुख्याधिकारी यांच्या सुचनेनुसार “मेरी माटी मेरा देश”उपक्रमाची माहिती दिल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावर बैठकी दरम्यान चांगल्याप्रकारे चर्चेत मंथन झाले.यावेळी अनेकांनी महत्वाच्या सुचना केल्या.त्यामध्ये पातूर तालुका विकास मंचाचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस यांनी आपले मत व्यक्त करताना शहरातील नागरिकांच्या आरोग्य,रस्ते,उद्यांन व चौकांचे शुशोभिकरण,नाल्यांना बंदीस्त करने,शुद्ध पिण्याचे पाणी,डोळ्यांच्या साथीवर नियंत्रण ठेवणे,आवश्यक त्याठिकाणी सार्वजनिक सुलभ सौचालय,कचरा व्यवस्थापन सह इतर बाबींचा विकासात्मक विचार व्हावा तसेच मिलिंद नगर येथील हुतात्मा स्मारकाची झालेली दुरवस्था दूर करने तसेच शहिद आनंदा काळपांडे यांच्या भव्य स्मारकासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे अशाप्रकारच्या मागण्यांबाबत आपले विचार मांडून नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी हे मुळचे पातूरचे असल्याने व त्यांना शहरात त्यांच्या सेवा काळात चांगले काम करण्याचे स्वप्न अनेक दिवसांपासून असल्याने त्यांची जबाबदारी आता वाढली असल्याचे आपले मत व्यक्त केले.
नगरपरिषद माजी उपाध्यक्षा वर्षा बगाडे यांनी राजकीय राजकारणाला बाजूला ठेवून शहराच्या विकास कामांना प्राधान्य क्रम देवून त्यामध्ये गती आणण्यासाठी एकत्र येऊन काम करावे असे मत व्यक्त केले.
निलेश गाडगे यांनी या उपक्रम कागदावर न राबवता प्रत्यक्षपणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झटणा-या लोकांना सोबत घेऊन या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यावर भर देण्याची रोखठोकपणे महत्वपूर्ण सुचना करून नगरपरिषद मधील सभागृहाला शहिद आनंदा काळपांडे हे नाव देण्याची मागणी केली.
पातूर तालुका विकास मंचाने केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्याधिकारी यांनी शहरातील सरकारी व नागरिकांच्या खाजगी विहिरीतील पाणी निर्जंतुक व शुद्ध करण्यासाठी ब्लिंचिंग पावडर तसेच डोळ्यांची साथ कमी करण्यासाठी मोफत औषधींचे वाटप या कार्यक्रम प्रसंगी केले त्यासाठी शिवकुमार बायस यांनी मुख्याधिकारींचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य,माजी सैनिक,माजी नगरसेवक,नगरसेविका,अधिकारी व कर्मचारी,पत्रकार बांधव,विविध पक्षाचे शहरप्रमुख,विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,जेष्ठ नागरिक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नगरपरिषद मुख्याधिकारी सैय्यद एहसानोद्दीन यांची उपस्थिती होती, प्रास्ताविक व सुत्रसंचलन आरोग्य अधिकारी महेश राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यालय अधिकारी भगत यांनी मानले.