अवैध अतिक्रमण करणा-र्या नगरसेवकांवर निवडणूक आयोग कार्यवाही करणार का?
भारतीय जनता पार्टी च्या माजी नगरसेवकांचा प्रचारासाठी अफलातुन फंडा?
अकोला:- भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांनी अफलातुन फंडा काढीत आपल्या नावाचे आपल्या पत्त्याचे फलक रस्त्यावर लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत असल्याने वंचीत आघाडीच्या जिल्हा प्रमुखांनी गैरमार्गाने लावलेल्या फलका विरोधात महानगरपालिका आयुक्त यांना योग्य कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले. शहर कोणतेही असो तिथे ज्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिले अशा महात्म्यांची नावे त्या शहरातील रस्त्याला दिले जातात.परंतु अकोला शहरातील माजी नगरसेवकांना याचे भान नसावे म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली हज को चली असा प्रकार यानिमित्ताने पहावयास मिळत आहे. हे फलक महानगरपालिकेच्या निधीतून लावण्यात आलेत का असाही प्रश्न वंचित बहुजन आघाडीने केला आहे. शासनाच्या नियमानुसार कोणत्याही राजकीय पद भोगलेल्या सदस्यास कुठेही अतिक्रमण करता येत नाही तसे केल्यास सबंधीत अधिकारी त्यांचा अहवाल निवडणूक आयोगास पाठवून त्या सदस्याविरुद्ध कठोर कार्यवाही चे प्रावधान आहे. वंचित बहुजन आघाडी ने याबाबत निवेदन दिल्यावर महानगरपालिका आयुक्त त्यांच्यावर कार्यवाही करणार का?तसा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवणार का?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.यावर आयुक्तांनी योग्य निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित चे जिल्हाप्रमुख यांनी दिला आहे. आता सर्व प्रकारावर शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे