वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करा. दहा दिवसांचा अल्टिमेट ‘वंचित’ने दिला आंदोलनाचा इशारा

वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करा. दहा दिवसांचा अल्टिमेट ‘वंचित’ने दिला आंदोलनाचा इशारा

अकोट प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष चरण इंगळे व महासचिव रोशन पुंडकर यांच्या नेतृत्वाखाली अकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, अकोला जिल्ह्यासह अकोट तालुक्यात वनविभागाची विविध राखीव कुरणे आहेत. अश्या राखीव जंगलात विविध वन्य प्राणी जसे रानडुक्कर, हरीण, कोल्हे, नीलगाय ई. यांचा अधिवास आहे. सदर प्राणी रात्रीचे वेळी या जंगलातुन बाहेर येऊन आजूबाजूच्या विविध गावांच्या शेत शिवारांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करतात. सदर प्राणी अनेकदा शेतकऱ्यांचा सामना झाल्यास त्यांच्यावर हल्ला सुद्धा केल्याच्या घटना सतत घडत असतात. या प्राण्याच्या दहशतीमुळे शेतकरी विविध नगदी पिके जसे की हरभरा, मुग, उडीद, तुर, सोयाबीन पिकवण्यास असमर्थ आहेत. अशाप्रकारच्या वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे अकोला जिल्ह्यासह व अकोट तालुक्यात शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून खुप जास्त शेती उपज नुकसानीला सामोरे जावे लागत आहे व परिणामतः शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य हरवत चालले आहे. तरी सदर आजतागायत शेजाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने त्वरित करावी.
तरी या निवेदनाद्वारे आम्ही आपणास नम्र विनंती करतो की आपण वन विभागाची विशेष पथके तयार करून सदर प्राण्यांना पकडुन जवळच असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये किंवा सोयीनुसार इतरत्र कायमस्वरूपी पूर्णतः स्थलांतरित करावे व शेतकऱ्यांना ९० % अनुदानावर शेतीकरिता तारेचे कुंपण उपलब्ध करून देण्यात यावे. सदर मागण्या येत्या १ ० दिवसांत पुर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्या तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व परिणामी होणाऱ्या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला. निवेदनावर अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर,दिपक बोडखे, जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई कोल्हे,निखिल गावंडे, सुनिल घनबहादुर, संतोष इंगळे,गौतम गावंडे,विनायक भरक्षे, राहुल इंगळे,लता कांबडे, अभिजीत गावंडे गौतम पंचांग, नंदकिशोर गोरडे,अतिक पटेल, बुद्धभूषण गावंडे, अमन गवई,जमु पटेल, विशाल आग्रे,ललिता तेलगोटे, मंगेश कांबळे, इम्रान खान पठाण,अर्चना वानखडे, दिनेश सरकटे,करूना तेलगोटे,सुगत वानखडे,मोहन तायडे, दिनेश घोडेस्वार, योगेश आग्रे प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सरकटे
यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सह्या केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news