किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ मेरी माटी मेरा देश अभियानाचा शुभारंभ
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – पातूर : शासनाच्या मेरी माटी मेरा देश या अभियांतर्गत किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पंचप्राण ची शपथ घेऊन शुभारंभ केला.
क्रांतिदिनाचे औचित्य साधून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या वेशभूषा साकारून मातीला वंदन केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक क्रांतीविरांच्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी आकर्षण ठरले होते. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना यावेळी शिक्षकांनी पंचपप्राण ची शपथ दिली. याप्रसंगी शाळेचे शिक्षक नरेंद्र बोरकर, पल्लवी पाठक, अश्विनी अंभोरे, अविनाश पाटील, शीतल कवडकर, नितु ढोणे, उमेर सर, किरणकुमार अवचार, हरिष सौंदळे, योगिता देवकर, लक्ष्मी निमकाळे, नयना उगले, प्रियंका चव्हाण, तृप्ती पाचपोर, घुले मॅम, प्रिती हिवराळे, बजरंग भुजबटराव, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदी उपस्थित होते.