आजादी का अमृत महोत्‍सव – ‘’मेरी माटी मेरा देश’’ उपक्रमांतर्गत अकोला मनपा अधिकारी/कर्मचारी यांनी घेतली पंचप्रण शपथ.

आजादी का अमृत महोत्‍सव – ‘’मेरी माटी मेरा देश’’ उपक्रमांतर्गत अकोला मनपा अधिकारी/कर्मचारी यांनी घेतली पंचप्रण शपथ.

अकोला दि. 9 ऑगस्‍ट 2023 – केंद्र शासनाच्‍या वतीने ‘’आजादी का अमृत महोत्सव’’ – ‘’मेरी माटी मेरा देश’’ या उपक्रमांतर्गत आज अकोला महानगरपालिका मुख्‍य कार्यालय, चारही क्षेत्रीय कार्यालय, मनपाच्‍या सर्व शाळा, अग्निशमन कार्यालय, मोटर वाहन विभाग, मनपा वैद्यकीय कार्यालय, एन.यु.एल.एम. कार्यालय तसेच आरोग्‍य निरीक्षक आणि सफाई कर्मचा-यांव्‍दारे त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये सामुहिकरित्‍या पंचप्रण शपथ घेण्‍यात आली. यावेळी मनपा अधिकारी/कर्मचारी यांनी शपथ घेतांनाची सेल्‍फी काढून प्रमाणपत्र डाउनलोड करून घेतला.

          यावेळी मनपा उपायुक्‍त गीता वंजारी, शहर अभियंता नीला वंजारी, संचालक नगररचना आर.एस.महाजन, सहा.संचालक, नगररचना, आशिष वानखडे, प्रशासन अधिकारी अनिल बिडवे,       बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे यांचेसह मनपा अधिकारी/कर्मचारी, शिक्षक/शिक्षिका तसेच सफाई कर्मचा-यांची मोठ्या संख्‍येने उपस्थिती होती.

           सदर उपक्रम हा दि. 9 ऑगस्‍ट क्रांती दिनापासून सुरू झाले असून या उपक्रमामध्‍ये शहरातील नागरिकांनी सहभाग घेउन पंचप्रण शपथ घेऊन आपले शपथ प्रमाणपत्र मिळवून या उपक्रमात आपले सहभाग नोंदवावा, सदर शपथ घेतांना प्रत्येक व्यक्तीच्या उजव्या हातात मातीचा दिवा किंवा मुठभर माती घेवून थपथ घेउन शपथ घेतांनाचा सेल्फी फोटोग्राफ काढून https://merimaatimeradesh.gov.in/ या वेब साईडवर अपलोड करून आपले शपथ प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्‍यावे असे आवाहन मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी केले आहे.

पंचप्रण शपथ –

आम्‍ही शपथ घेतो की,

0 भारतास 2047 पर्यंत आत्‍मनिर्भर आणि विकसित राष्‍ट्र बनविण्‍याचे स्‍वप्‍न साकार करू.

          0 गुलामीची मानसिकता मुळापासून नष्‍ट करू.

0 देशाच्‍या समृध्‍द वारशाचा गौरव करू.

0 भारताची एकात्‍मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करण्‍याप्रती सन्‍मान बाळगू.

0 देशाचे नागरीक म्‍हणून सर्व कर्तव्‍यांचे पालन करू.

———————————————————————————————————————

 महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे हुतात्‍मा स्‍मारक येथे  क्रांतीदिन साजरा.

अकोला दि. 9 ऑगस्‍ट 2023 – आज दि. 9 ऑगस्‍ट क्रांती दिन निमित्‍त हुतात्‍मा स्‍मारक येथे आयोजित कार्यक्रमामध्‍ये सर्व प्रथम उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हुतात्‍म्‍यांना आदरांजली वाहण्‍यात आली आणि ज्‍येष्‍ठ स्‍वातंत्र्य सेनानी श्री विलासजी मुंजे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करून ‘’मेरी माटी मेरा देश’’ या उपक्रमांतर्गत उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली तदनंतर ज्‍योति विद्यालय, राष्‍ट्रीय शाळा व गुरूनानाक विद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थींनी यांच्‍या व्‍दारे भारत माता, शहीद भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, झांसीची राणी, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या वेशभुषा घालून आणि सांस्‍कृतिक कार्यक्रांचे सादरीकरण करण्‍यात आले.

          यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, सुधीर माल्‍टे, योगेश मारवाडी, मुकुंद घाटगे, गजानन ढवळे, गौतम कांबळे यांचेसह ज्‍योति विद्यालय, राष्‍ट्रीय शाळा व गुरूनानाक विद्यालयातील शिक्षक/शिक्षिका व विद्यार्थी आणि बांधकाम विभागातील कर्मचा-यांची मोठ्या संख्‍येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news