स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त!
एक आरोपीस अटक केत!
अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस प्रभारी शंकर शेळके यांना कमला नेहरू नगर येथील एका तरुणाकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी अकोल्यातील लक्झरी बसस्थानकामागील कमला नेहरू नगर येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी यश उर्फ अजय गुलाब धुरिया याला अटक करून त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे काडतुसे व एक जिवंत काडतूस जप्त केले. या कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कैलास भगत, एएसआय गणेश पांडे, राजपालसिंग ठाकूर, रवी खंदारे, अब्दुल मजीद, संतोष दाभाडे, एजाज यांच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी शंकर शेळके, अमोल दिपके, चालक प्रशांत कमलाकर यांनी केले. पोलीस पुढील तपास करत आहेत.