जागतिक आदिवासी दिन व क्रांति दिन संपन्न
मनोज भगत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
आकांक्षा टायपिंग अँड कम्प्युटर इन्स्टिट्यूट हिवरखेड यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन, लोकनायक बिरास मुंडा यांची पुण्यतिथी व क्रांति दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकांक्षा टायपिंग चे प्राचार्य श्री बंडू लहाने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गट ग्राम पंचायत भिली येथील युवा सरपंच संजय राजाराम भिलावेकर, ग्राम पंचायत सदस्य प्रीतम बेठेकर, पालक प्रतिनिधी रामकिसन चव्हाण हे होते. तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. मयूर लहाने हे होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्याचे स्वागत व तसेच लोकनायक बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळी युवा सरपंच संदजय भिलावेकर यांनी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समुदायातील होतकरू विद्यार्थ्याना गट ग्राम पंचायत भिली येथील तरुणांसाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आकांक्षा टायपिंग अँड कम्प्युटर इन्स्टिट्यूट हिवरखेड यांच्याशी करार करून १५ व्या वित्त आयोगातील सेस फंड मधून आदिवासी समुदायातील होतकरू विद्यार्थ्याना मोफत संगणक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांनी त्यांनी एकविसाव्या शतकातही जगातील विविध भागांत राहणारा आदिवासी समाज आजही बेरोजगारी बालमजूरी भेदभाव उपेक्षा स्थलांतर अन्न वस्त्र निवारा गरीबी निरक्षरता आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा मोल मजुरी, सामाजिक विकास, आर्थिक प्रश्न शैक्षणिक मागासलेपणा अशा प्रकारच्या समस्यांना सामोरा जात आहे. याचे चित्रण मांडले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. मयूर लहाने यांनी आपल्या मार्गदर्शनात संबोधित करताना आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे संस्कृतीचे रक्षण करणे त्यांचा जल-जंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा त्यांची विशिष्ट संस्कृतीओळख हक्क आणि अधिकाराची ओळख, सामाजिक ऐक्य अस्तित्व, स्वाभिमान आत्मसन्मान, अस्मिता कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती कौशल्य आधारित प्रशिक्षण मिळावे. या करीता अशा तरुण पिढीचे किती महत्व आहे ते पटवून दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रवण दांडेकर अ. शकिल सचिन गवते, पूनम चव्हाण राधा जामभेकर सारथी भिलावेकर तसेच नेहरू युवा केंद्र अकोला अंतर्गत आकांक्षा युवा मंडळाचे स्वयं सेवक यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम चव्हाण यांनी केले तर आभार सचिन गावते यांनी मानले.